Ganeshotsav : आगमन-विसर्जन मार्गांवरील खड्डे एका आठवड्यात बुजवा; पालिका आयुक्तांचे आदेश

गणरायाच्या आगमन व विसर्जन मार्गांत अडथळा ठरणारे खड्डे पुढील एक आठवड्यात बुजवा, असे आदेश आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी उपायुक्त, सहायक आयुक्त, अभियंत्यांना दिले आहेत.
Mumbai Municipal Commissioner Iqbal Chahal
Mumbai Municipal Commissioner Iqbal Chahalsakal
Updated on

मुंबई - गणरायाच्या आगमन व विसर्जन मार्गांत अडथळा ठरणारे खड्डे पुढील एक आठवड्यात बुजवा, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी उपायुक्त, सहायक आयुक्त, अभियंत्यांना दिले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान श्री गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरळीत पद्धतीने व्हावे, यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गांचा आढावा घ्यावा, असे निर्देश ही चहल यांनी संबंधितांना दिले आहेत.

येत्या १९ ते २८ सप्टेंबर या कालावधी दरम्यान श्री गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सव आनंदात आणि सुरळीतपणे पार पडावा, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये गणेशमूर्तींचे आगमन तसेच विसर्जन मार्गाची पाहणी करून आवश्यक असेल तिथे डागडुजी करणे, गणेशोत्सवादरम्यान विविध गणेश मंडळांच्या परिसरात अधिकाधिक स्वच्छता राखणे, विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था राखणे, गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानग्या देणे गणेशोत्सव संबधी कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश चहल यांनी दिले आहेत. तसेच रस्त्यांची नियमितपणे पाहणी करून खड्डे आढळून आल्यास ते त्वरित भरण्याच्या निर्देश दिले आहेत.

गणेशाचे आगमन, विसर्जनादरम्यान कोणत्याही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, याची खात्री करावी. यासाठी २४ विभागातील परिमंडळ उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागीय कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता, मुख्य अभियंता (रस्ते), उपायुक्त (सुविधा) यांनी विविध मार्गांची पाहणी करून त्या मार्गावर खड्डे असल्यास ते बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी. पुढील एका आठवड्यात ही कार्यवाही करत या मार्गांवर खड्डे राहणार नाहीत ही खबरदारी घ्यावी, असेही निर्देश चहल यांनी दिले आहेत.

कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश

खड्डे बुजवण्याच्या कार्यवाहीचा संपूर्ण अहवाल उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले हे नियमितपणे घेतील आणि सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे यांना सादर करावा. खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दीष्ट साध्य करत काही समस्या किंवा अडचणी उद्भवल्यास, पुढील दोन दिवसांत त्या तातडीने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांना सांगणे, असेही चहल यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.