Thane Latest update: गणेशोत्सवाला दीड /दोन महिने बाकी असतानाच गणेश भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून शहापूर येथील सुमित शेट्टी व केतकी शेट्टी या दाम्पत्याने बनविलेल्या आकर्षक गणेश मूर्त्यांची ख्याती सातासमुद्रापार गेल्याने त्यांनी बनविलेल्या मूर्त्याना बाहेर देशातून दिवसेंदिवस मागणी वाढत असून ह्यावर्षी बाहेर देशात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आजपर्यंत 1250 गणेश मुर्त्या मलेशिया,साऊथ आफ्रिका, थायलंड,लंडन,आस्ट्रेलिया,लंडन व दुबई याठिकाणी रवाना झाल्या आहेत
.
गेल्या 4 वर्षापूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नोकरी गेलेल्या सुमितने आपल्या पत्नी व मित्रांसोबत मुर्त्या बनवून विकण्याच्या व्यवसायाला सुरवात केला होता,त्यांच्या व्यवसायाला'विघ्नहर्ता गणपती बाप्पा' पावला असून त्यांना ह्यावर्षी बाहेर देशातून व भारतातूनगणपती बाप्पाच्या मूर्त्यांची मागणी वाढत आल्याने त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यांनी या मेहनतीच्या जीवावर चेंबूर येथेही गणपती बाप्पा च्या मुर्त्या बनवण्याचा कारखाना सुरू केला असून त्यात 19 बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे मूर्तिकार सुमित शेट्टी यांनी सांगितले.
शहापुर येथील सुमीत शेट्टी व पत्नी केतकी शेट्टी यांनी गणपती कारखान्यात मूर्ती बनवायचा अनुभवाचा फायदा घेत गणेश मुर्त्या बनवून प्रदर्शन व विक्री व्यवसाय सुरु केला होता.यासाठी त्यानी पेण येथून गणेश मुर्त्याचे कच्चा माल आणून विविध प्रकारच्या मुर्त्या बनवायचे काम सुरु करून सोशल मिडियावर बनवलेल्या मुर्त्याची जाहिरात केली व त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.
सुमित व शुभमने '6 इंच ते 4 फूटा' पर्यंत मुर्त्या बनवून विक्री साठी ठेवल्या असून त्याची कीमत 1200 रुपयापासून 21 हजार रुपयापर्यंत आहेत.सोशल मीडिया वरील जहिरातीमुळे गुजरात, औरंगाबाद, जालना, ठाणे व कल्याण येथून या गणेश मुर्त्याना मागणी वाढली असतानाच आता त्यांना बाहेर देशातून मागणी येत आहे. परिसरातील गणेश भक्ताचीही त्यांच्याकडे या आकर्षक गणेश मुर्त्यासाठी गर्दी झाली आहे.सद्या त्यांच्याकडे 19 कर्मचारी काम करीत असून,बाहेरगावी ने-आण सोयीस्कर व्हावी यासाठी चेंबूर (मुंबई)येथे भाड्याने कारखाना सुरू केला आहे.सद्या मूर्त्यांची कच्या मालाची किंमत 20 टक्क्यांनी वाढली आहे.ह्यांनी बनविलेल्या मुर्त्या इंदोर,पालघर,पुणे,ठाणे, डोंबिवली व कल्याण इत्यादी येथील रिटेल शॉप मध्ये विक्रीसाठी नेल्या जात असून 7500 मुर्त्या एकदम होलसेल भावात दिल्या आहेत.
या गणेश मुर्त्याच्या व्यवसायामुळे आम्हाला रोजगार उपलब्ध झाला असल्याने व सद्या आम्ही बनविलेल्या मूर्त्याना बाहेर देशातून मागणी येत असल्याने आम्हाला गणपती बाप्पा पावला असून आमच्यावरिल बेरोजगारीच विघ्न विघ्नहर्ता गणपती बाप्पाने दूर केल असल्याचे शेट्टी दाम्पत्याने सांगितले.
"कोरोनामुळे आमची नोकरी गेल्याने आम्ही शहापुरात 60 गणपती मुर्त्या बनवण्यापासून सुरू केलेला कारखानाआज गणपती बाप्पा च्या आशीर्वादामुळे 9 ते 10 हजार गणपती मुर्त्या बनवण्यापर्यंत पोहचला असून त्यासाठी आमचे दोघांची मेहनत व स्थानिक मित्रमंडळी च सहकार्य यामुळे हे शक्य झालं आहे."केतकी शेट्टी व सुमित शेट्टी,मूर्तिकार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.