मुंबई : गणेशोत्सवानिमित्त (Ganpati Festival) प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वेकडून (Indian Railway) एलटीटी ते मडगाव, कोचुवेली दरम्यान विशेष गाड्यांची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या 31 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनच्या वेळापत्रकानुसार (Monsoon Time Table) धावतील. तर, 1 नोव्हेंबरपासून नॉन-मॉन्सून वेळापत्रकानुसार धावतील, असे मध्य रेल्वेकडून (Central Railway) सांगितले आहे. (Ganpati festival mumbai to madgaon journey special trains resumes)
गाडी क्रमांक 01085 एलटीटी- मडगाव साप्ताहिक डबल डेकर विशेष गाडी 2 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबरपर्यंत एलटीटीहून दर सोमवारी आणि बुधवारी पहाटे 5.33 वाजता सुटेल आणि त्याचदिवशी सायंकाळी 5.00 वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर, 1 नोव्हेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर सोमवारी व गुरुवारी एलटीटीहून पहाटे 5.33 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगावला दुपारी 4.45 वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिवि या स्थानकावर थांबे देण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक 01099 एलटीटी - मडगाव साप्ताहिक विशेष गाडी 7 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबरपर्यंत एलटीटीहून दर शुक्रवार- शनिवारीच्या मध्यरात्री 12.45 सुटेल आणि त्याचदिवशी मडगावला दुपारी 1.25 वाजता सुटेल. तर, 1 नोव्हेंबरपासून पुढील सुचना मिळेपर्यंत एलटीटी येथून रात्री 12.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगावला सकाळी 11.15 वाजता पोहचले. या गाडीला ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी या स्थानकावर थांबे देण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक 01213 एलटीटी - कोचुवेली साप्ताहिक विशेष गाडी 3 ऑगस्टपासून ते 31 ऑक्टोबरपर्यंत एलटीटी येथून दर मंगळवारी आणि शनिवारी दुपारी 4.55 वाजता सुटेल आणि कोचुवेलीला दुसर्या दिवशी रात्री 11 वाजता पोहचेल. तर, 2 नोव्हेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत एलटीटी येथून दुपारी 4.55 वाजता सुटेल आणि कोचुवेलीला दुसर्या दिवशी रात्री 8.25 वाजता पोहेचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पेरनेम, मडगाव, कारवार, भटकळ, उडुपी, मंगलुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, थलासेरी, कोझिकोड, तिरुर, षोरानूर, तृश्शूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेन्गन्नुर, कोल्लम येथे थांबे देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.