उल्हासनगर महापालिकेसमोर कचऱ्याच्या गाड्या उभ्या करुन कामगारांचे आंदोलन

गणेशोत्सवात पगार थकवल्याने कामगार, ड्रायव्हरांचे आंदोलन
Ulhasnagar municipal strike
Ulhasnagar municipal strikesakal media
Updated on

उल्हासनगर : गणेशोत्सवात (Ganpati Festival) पगार थकवण्यात आल्याने (no salary) आज कचरा उचलणाऱ्या कामगार, ड्रायव्हरांनी चक्क महानगरपालिकेसमोर (ulhasnagar municipal) कचऱ्याच्या गाड्या उभ्या करून आंदोलन (strike) केले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड (sandip Gaikwad) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.

Ulhasnagar municipal strike
गणेशोत्सवात केवळ 7 दिवसांची सुट्टी ? शिक्षक संभ्रमात

कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला उल्हासनगरातील कचरा उचलण्याचा कंत्राट देण्यात आला आहे. यात 500 कामगार, ड्रायव्हर कंत्राटी पध्दतीने काम करत असून त्यांना श्रेणीनुसार पगार देण्यात येतो. हे सर्व कामगार संदीप गायकवाड यांच्या लढा कामगार संघटनेशी संलग्न आहेत. गणेशोत्सव असल्याने आणि त्यासाठी नवीन कपडे आदींचा खर्च असल्याने पगार गणेशोत्सवापूर्वी मिळणे अपेक्षित होता. मात्र गणेशोत्सव एका दिवसावर आला असतानाही पगाराची काही हालचाल दिसत नसल्याने कचरा उचलणाऱ्या,कचरा गाडीवर काम करणाऱ्या कामगार,ड्रायव्हर यांनी डंपिंग ग्राऊंडकडे जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या थेट पालिकेसमोर आणून उभ्या करून आंदोलन सुरू केले.

गेल्या अनेक वर्षांपासून कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी कचऱ्याचा कंत्राट हाताळत आहे.मात्र अलीकडे काही महिन्यांपासून पालिकेच्या वतीने वेळेवर बिल मिळत नाही.तरीही कंपनी पदरमोड करून पगार देत असते.यावेळेस कंपनीकडे 500 कामगारांच्या पगारासाठी रुपये नसल्याने पगार देता येत नसल्याची माहिती कोणार्कचे संचालक राजेश वधारिया यांनी दिली.पालिकेने दर महिन्याला वेळेवर बिल द्यावे अशी मागणी देखील वधारिया यांनी केली.

या आंदोलनाची दखल घेऊन पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांच्या आदेशानुसार लेखा विभागाने कामगारांचा पगार कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या खात्यात जमा केला आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी दिली. पगार तात्काळ व्हावा या मागणीसाठी कचऱ्याच्या गाड्या दोन ते तीन तास पालिकेसमोर उभ्या करण्यात आल्या होत्या.पगार कोणार्कच्या खात्यात जमा होताच गाड्या डंपिंग ग्राऊंडकडे रवाना करण्यात आल्याचे संदीप गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.