मुंबईतील सिल केलेल्या भागांमधला कचरा असणार बायोमेडिकल वेस्ट, वेगळ्या पद्धतीनं लावली जाणार विल्हेवाट

मुंबईतील सिल केलेल्या भागांमधला कचरा असणार बायोमेडिकल वेस्ट, वेगळ्या पद्धतीनं लावली जाणार विल्हेवाट
Updated on

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेऊन लॉकडाऊन पाळण्यात येतंय. त्यात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर गेल्या काही दिवसांत मुंबईच्या गजबजलेल्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे तब्बल १५० जागांना सील करण्यात आलंय. लोकांना घराबाहेर पडण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. अशात या सिल केलेल्या भागांमधला जमा होणारा कचरा आता बायोमेडिकल वेस्ट म्हणून वेगळ्या पिशवीत ठेवला जाणार आहे.

मुंबईतल्या १५० सीलबंद जागांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरच्या कचऱ्यामुळेही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे हा कचरा एका पिवळ्या रंगाच्या पिशवीत जमा केला जाणार आहे. त्यानंतर त्याची शहराबाहेरच्या देवनारच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यासाठी या भागात राहणाऱ्या लोकांना पिवळ्या रंगाच्या पिशव्यांचं वाटप करण्यात आलं आहे.

बायोमेडिकल वेस्ट जमा करणाऱ्या 'एसएमएस' या कंपनीसोबत प्रशासनानं या संबंधीचा करार केला आहे. लोकांना वाटप करण्यात आलेल्या पिवळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये लोकांनी कचरा जमा करावा. त्यानंतर या कंपनीचे कर्मचारी येऊन त्या पिशव्या घेऊन जाणार आहेत. त्यासाठी कंपनीनं या कर्मचाऱ्यांना खास सूट दिले आहेत  जो सूट घालून हे कर्मचारीही सुरक्षित राहू शकणार आहेत.  

हा सर्व बायोमेडिकल कचरा एका ठिकाणी जमा केला जाणार आहे. त्यानंतर या कचऱ्याला एका गाडीत ठेऊन शहराबाहेर नेण्यात येणार आहे. घनकचरा पिवळ्या पिशवीत तर इतर कचरा काळ्या पिशवीत ठेवण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. हा सर्व कचरा देवनारच्या डंपिंग ग्राऊंडमध्ये नेण्यात येणार आहे. बायोमेडिकल कचऱ्याची इथं विल्हेवाट लावली जाणार आहे तर इतर सर्व कचरा ब्लिचिंग पावडर टाकून गाडला जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सुरक्षेचे साधनं देण्यात येणार आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळतेय.

garbage from covid 19 sealed areas will be considered as biomedical waste  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.