डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे ढीगारे कोसळून आठ घरांचे नुकसान, जीवितहानी टळली

garbage
garbage
Updated on

भाईंदर : मीरा भाईंदर पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे ढीग शनिवारी रात्रीच्या मुसळधार पावसाने उत्तन गावाजवळील धावगी येथील घरांवर पडून आठ घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी घरांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे ढीग पावसाच्या पाण्याबरोबर वाहत येऊन राहत्या घरांवर पडले. हे ढीग वाहत येताना आवाज झाल्याने नागरिक घरातून बाहेर आल्याने जीवितहानी टळली. मात्र यामध्ये पिठाची गिरणी वाहून गेली, तसेच सुरेश कदम, लीलाबाई कदम, विकास जगताप, वाहिद खान, महंमद राबे, पप्पू खान, राजू देवकाते, समीर पठाण, झरीना खान यांच्या घरांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, सागरी पोलिस प्रशासन, प्रभाग अधिकारी, अदाणी कंपनीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन टीमने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी दिली.

स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष
उत्तन येथील हे डम्पिंग ग्राऊंड हटविण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून स्थानिक नागरिक मीरा-भाईंदर पालिका प्रशासनाशी लढा देत आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष करून, कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करता याठिकाणी कचरा टाकण्यात येतो. त्यामुळेच कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर येथे उभे राहत आहेत.

शनिवारी रात्री आपत्ती व्यवस्थापनाची टीम, अग्निशमन दल, पोलिस यांच्या सहाय्याने ज्या घरांवर आपत्ती आली होती, तेथील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून इतर ठिकाणी आसरा देण्यात आला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनीही सतर्क राहावे.
असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. 
- अजित मुठे, उपयुक्त, मीरा-भाईंदर महापालिका

Garbage piles collapse from dumping ground damage to eight houses

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.