समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पासाठी गारगाई धरणाचा प्रकल्प एक वर्ष प्रतिक्षेत ठेवण्याचा निर्णय

समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पासाठी गारगाई धरणाचा प्रकल्प एक वर्ष प्रतिक्षेत ठेवण्याचा निर्णय
Updated on

मुंबई, ता. 1: मनोरी येथे प्रस्तावित असलेल्या समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पासाठी गारगाई धरणाचा प्रकल्प एक वर्ष प्रतिक्षेत ठेवण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाचा अभ्यास एक वर्ष चालणार आहे. त्यानंतर हा प्रकल्प शक्‍य असल्यास गारगाई प्रकल्प रद्दही केला जाण्याची शक्‍यता आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महानगर पालिकेला समुद्राचे पाणी गाडे करण्याचा प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रकल्प उभारण्यासाठी महानगर पालिकेने मनोरी येथील भुखंडाचा विचार केला आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रकल्प उभारण्यासाठी 20 विविध प्रकारचे अभ्यास करावे लागणार आहे. तसेच, प्रकल्पाचा समुद्र आणि जलचरसृष्टीवर उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा तीन्ही मोसमात होणाऱ्या परीणामाचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतरच या प्रकल्पाचा अंतिम निर्णय होणार आहे. मात्र, यासाठी गारगाई प्रकल्प वर्षभर प्रतिक्षेत ठेवला जाणर आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्याचे निश्‍चित झाल्यानंतर गारगाई प्रकल्पही रद्द केला जाणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईचा पाणीपुरवठा हा धरणावर अवलंबून असल्याने जागतिक हवामना बदलामुळे पावसाचे प्रमाण अनिश्‍चित झाले आहे.त्यामुळे उन्हाळ्या पासून पाऊस सुरु होई पर्यंत पाणी पुरवठ्यात कपात करावी लागते. त्यामुळे समुद्राचे पाणी गोडे करुन त्याचा पुरवठा करण्याचा विचार पुढे आला आहे. तसेच, गारगाई प्रकल्पासाठी साधारण तीन लाखाच्या आसपास झाडे कापावी लागणार आहेत. समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी लागणारी विज ही मध्य वैतरणा धरणात उभारण्यात येणाऱ्या सौर उर्जा प्रकल्पातून वापरण्यात येईल असे पालिकेचे अतिरीक्त आयुक्त पी.वेलारसू यांनी सांगितले.

400 दशलक्ष लिटरची तुट :

मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत असून रोज गरजे पेक्षा 400 दशलक्ष लिटरहून अधिक पाण्याची कमतरात आहे. तसेच, भविष्यता 1 हजार दक्षलक्ष लिटर अधिक पाणी लागणार आहे. त्यामुळे त्याचे नियोजन आतापासूनच करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गारगाई धरणातून 440 दशलक्ष लिटर पाणी रोज मिळणार होते. तर, समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प 400 दशलक्ष लिटरचा उभारण्यात येणार आहे.

gargai dam project postponed for one year bmc will conduct detail study of the project

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.