Gas Cylinder : गॅस सिलेंडरचे भाव २०० रुपयांनी कमी पण... मोदी सरकारच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया

घरगुती गॅस सिलेंडरचे भाव २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकरने घेतला. या निर्णयाचे गृहिणींकडून स्वागत करण्यात आले आहे.
 Gas cylinder
Gas cylinderesakal
Updated on

मुंबई - घरगुती गॅस सिलेंडरचे भाव २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकरने घेतला. या निर्णयाचे गृहिणींकडून स्वागत करण्यात आले आहे. तर अनेक गृहिणींनी या किमती ५०० रुपयांपर्यंत कमी कराव्या अशी मागणीही केली आहे.

कांद्यानंतर टोमॅटोने डोळ्यात पाणी आणले होते. सिलिंडरचे भाव दिवसेंदिवस दिवस वाढत आहे. महागाईमुळे सामान्य महिलांचे कंबरडे मोडत आहे. हातावरचे पोट घर कसे चालवायचे असा प्रश्न पडत आहे. सिलेंडरचा भाव केवळ दोनशे रुपयाने कमी झाला तरी दर हजारी पार आहेच आहे. भाव ५०० ते ६०० पर्यंत आला तरच गरीबांना परवडण्यासारखे आहे.

- दीक्षा कदम, गृहिणी,नेहरुनगर

गॅस चे दर कमी झाले त्यामुळे जरा बरे वाटल. मात्र गेल्या काही वर्षापासून सिलिंडरचे दर सातत्याने वाढले त्याचे काय? शिवाय सिलेंडर वेळेवर मिळत नाही. आणि सबसिडी ही येत नाही. सरकार आमचे पैसे घेऊन आमची फसवणूक करीत आहेत. आता २०० रुपयाने सिलिंडर स्वस्त झाला असला तरी कधी भाव वाढेल याची कल्पना नाही. गरीबांना जगणं मुश्किल झाले आहे.

- अंबिका सोनवणे, गृहिणी, चेंबुर

सिएनजी दर कपात केव्हा?

घरघुती गॅस सिंलिडरचे दर २०० रुपयाने कमी केल्याचे स्वागत आहे. मात्र त्यामुळे महागाई आटोक्यात येणार नाही. त्यासाठी सिएनजी दर सरकारने कमी करावे. यासंदर्भात आम्ही राज्य, केंद्र आणि महानगर गँस प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.

रिक्षा, टॅक्सीसाठी वापरण्यात येणाऱ्या सिएनजी दरात ४० टक्के सवलत देण्याची मागणी केली आहे. त्यामूळे रिक्षा, टॅक्सी चालकांनाच फायदा होईल असे नाही. दर कमी झाल्यास प्रवाशांना महागाईचा फटका लागणार नाही. या मागणीक़डे सरकारने लक्ष दिले पाहीजे.

- शशांक राव, सरचिटणीस, मुंबई ऑटो टॅक्सी मेन्स युनियन

महागाई कमी होणार नाही

घरघुती गॅस सिलेंडर २०० रुपयाने स्वस्त केल्यामुळे मध्यवर्गीयांना फायदा होईल.मात्र त्याचा परिणाम महागाई कमी होण्यावर पडणार नाही.हॉटेल, उपहारगृहे, वडा पाव आणि इतर स्टॉलवर व्यावसायिक वापराचे सिलिंडर वापरले जाते. त्या सिलिंडर सिलिंडरच्या किंमती कमी झालेल्या नाही. त्यामुळे घराबाहेरील अन्न पदार्थाचे दर तसेच राहणार आहे. परिणामी सामान्यांना त्याचा काही दिलासा मिळणार आहे.

या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र या निर्णयाचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा किंमत ५०० ते ६०० रुपयांपर्यंत खाली येईल. या निर्णयामुळे गृहिणींच्या बजेटवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण ११०० रुपयांचा सिलेंडर आजही ९०० रुपयांना घ्यावा लागणार आहे.

- प्रिया सकुंडे, गृहिणी, शिवडी

२०० रुपयांनी किंमत कमी झाली आहे. या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना आणि गरिबांना दिलासा मिळेल. तरीही या किमती आणखी कमी करण्यावर सरकारने भर द्यावा. आज भाजीपाला, दूध यासर्वच गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे रोज कमवूनही घरातील बजेट सांभाळणे कठीण झाले आहे.

- माया जाधव, गृहिणी, प्रभादेवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.