CM शिंदे, शरद पवार भेटीनंतर गौतम अदानी पवारांच्या भेटीला; वेगवान घडामोडींमुळं चर्चांना उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गौतम अदानी अनेकदा दिसून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गौतम अदानी अनेकदा दिसून आले आहेत. Sakal
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट झाली होती. यानंतर काही मिनिटांतच पवारांच्या भेटीसाठी उद्योगपती गौतम अदानी त्यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.

गेल्या काही वेळातच घडणाऱ्या या वेगवान घडामोडींमुळं चर्चांना उधाण आलं आहे. (Gautam Adani meets Pawar after CM Shinde Sharad Pawar meeting rapid developments happening)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गौतम अदानी अनेकदा दिसून आले आहेत.
Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; मुख्यमंत्री तातडीने वर्षा निवासस्थानी दाखल

आधी शिंदे-पवार आणि नंतर पवार-अदानी या दोन महत्वाच्या भेटींनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पण वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या भेटींनंतर यामध्ये काही लिंक आहेत का? याबाबत आता चर्चा होऊ लागली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गौतम अदानी अनेकदा दिसून आले आहेत.
Ariha Shah Case: चिमुकल्या अरिहा शहाच्या सुटकेसाठी CM शिंदेंचं महत्वाचं पाऊल; परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलं पत्र

दरम्यान, मुख्यमंत्री आणि पवार यांच्यात ४० मिनिटं भेट झाली. भेटीनंतर पवार बाहेर आले आणि थेट आपल्या गाडीत बसून माध्यमांच्या प्रतिनिधींशी न बोलताच निघून गेले. पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे वृत्तवाहिन्यांना फोनवरुन प्रतिक्रिया दिली आणि मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी पवार आपल्याचं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.