गहना वशिष्ठच्या पोलीस कोठडीची आवश्यकता का आहे? - हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

gehana vasisth
gehana vasisth sakal
Updated on

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात (pornography case) अटकपूर्व जामीनासाठी (anticipatory bail) अर्ज करणाऱ्या अभिनेत्री गहना वशिष्ठच्या (Gehana vasisth) पोलीस कोठडीची (police arrest) आवश्यकता का आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) आज मुंबई पोलिसांना (Mumbai police) विचारले.

gehana vasisth
अमित ठाकरेंचा उद्यापासून नाशिक दौरा; पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी खलबतं

फेब्रुवारी मध्ये गुन्हा दाखल झाला असताना पोलीस आता तपास करत आहेत, याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. पोलिसांनी यावर भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश न्या. संदिप शिंदे यांनी दिले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तिची चौकशी केली आहे. पहिला गुन्हा दाखल झाला तेव्हा तिला अटकही केली होती. त्यानंतर आता चार तक्रारी दाखल आहेत, असे गहनाच्या वतीने एड अभिषेक येंडे यांनी युक्तिवाद केला. तिची बॅंक तपशील आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले.

या अटकपूर्व जामीन अर्जाला पोलिसांकडून सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी विरोध केला. आरोपींनी तक्रारदारांना धमकावले आणि अश्लील चित्रिकरणात सामील केले, असा आरोप त्यांनी केला. न्यायालयाने पुढील सुनावणी ता 31 रोजी निश्चित केली असून पोलिसांना बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तोपर्यंत तिच्यावर पोलीस कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.