आदिवासी तरुणाच्या प्रबंधाचे जर्मनीत पुस्तक 

डहाणूतील डॉ. सुमित ढाक यांच्या पुस्तकाचे जर्मनीत प्रकाशन.
डहाणूतील डॉ. सुमित ढाक यांच्या पुस्तकाचे जर्मनीत प्रकाशन.
Updated on

डहाणू ः डहाणूतील उच्चशिक्षित आदिवासी तरुणाने मृद्‌ व जलसंधारण अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वाचा संशोधनात्मक प्रबंध सादर केला आहे. त्यावर आधारित माहितीचे संकलन करून जर्मनीच्या लंबर्ट अकॅडमी पब्लिकेशनने पुस्तक प्रकाशित केले आहे. डॉ. सुमित ढाक असे या तरुणाचे नाव असून त्यांच्या या कार्याचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर निनादल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 

डॉ. सुमित ढाक यांचे पहिले ते पाचवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वाकी येथील आश्रमशाळेत झाले. त्यानंतर त्यांचे माध्यमिक शिक्षण के. एल. पोंदा हायस्कूल डहाणू येथे झाले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डी पी. जी. ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

तेथे त्यांनी तालुक्‍यात आदिवासी समाजातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. त्यांनी चार वर्षांची कृषी अभियांत्रिकी पदवी डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली येथे पूर्ण केली. 2011 ला एम.टेक.ची पदवी मिळवून मृद्‌ आणि जलसंधारण अभियांत्रिकी महाराणा प्रताप महाविद्यालयात पूर्ण केले. एम.टेक. करताना त्यांना दोन वर्षांसाठी केंद्र सरकारकडून आयसीएआर-जेआरएफ अवॉर्ड फेलोशिपने सन्मानित करण्यात आले. 

डॉ. ढाक यांनी मृद्‌ आणि जलसंधारण अभियांत्रिकी विषयात 2015 ला विद्यावाचस्पती (पीएच.डी.) प्राप्त केली. मुख्य प्राध्यापक प्रा. डॉ. एस. आर. भाकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी "मॉडेलिंग ऑफ मायक्रोक्‍लायमेट अँड रेफरन्स ईवॅपोट्रान्सपोरेशन इन पोलीहाऊस' हा प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याने त्यांना इन्स्पायर अवॉर्ड आणि राजीव गांधी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. राज्य सरकारने "आदिवासी रत्न' देऊन त्यांना गौरवले. 

डॉ. ढाक यांचा "मॉडेलिंग ऑफ मायक्रोक्‍लायमेट अँड रेफरन्स ईवॅपोट्रान्सपोरेशन इन पोलीहाऊस' हा प्रबंध जर्मनी येथील लंबर्ट अकॅडमी पब्लिशिंग या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाने पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. सुमारे 450 पानांच्या या पुस्तकामध्ये पोलीहाऊसमधील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, पाण्याचे बाष्पीभवन, वाऱ्याचा वेग या हवामान आधारित घटकांचा सखोल अभ्यास करून मॉडेल तयार करण्यात आले आहे. सध्या हे पुस्तक संपूर्ण जगभरात प्रकाशित झाले आहे. 

जागतिक स्तरावरील नामांकित लंबर्ट अकॅडमीने पीएच.डी. प्रबंधाचे पुस्तकरूपाने प्रकाशित केल्याचा आनंद आहे. याचे श्रेय मुख्य प्राध्यापक डॉ. एस. आर. भाकर, प्रा. पी. के. सिंग यांचे आहे. वडील मधुकर ढाक, आई नंदा ढाक, मामा अशोक सापटे आणिपत्नी देवयानी ढाक यांचेही यशात महत्त्वाचे योगदान आहे. 
डॉ. सुमित ढाक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.