मुंबई : मराठी विश्वकोश मंडळाने तयार केलेल्या आणि शालेय विद्यार्थ्यांपासून विविध क्षेत्रातील अभ्यासक, संशोधकांसाठी कायमच संदर्भ आणि परिपूर्ण माहितीसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज असलेल्या कुमार कोशाच्या 'जीवसृष्टी आणि पर्यावरण' या विषयावरील एकूण चार खंडातून अंकुरण ते ज्ञानेंद्रिय या विषयावरील परिपूर्ण माहिती, त्याचे संदर्भ मराठी वाचकांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहेत.
यासाठी लवकरच या विषयावरील उर्वरित दोन खंडाचे सुरूवातील ई-लोकार्पण आणि त्यानंतर पुस्तकरूपाने ही खंड उपलब्ध होणार आहेत. मंडळाने २० वर्षांपूर्वी 'जीवसृष्टी आणि पर्यावरण' या मूळ विषयावरील पहिला खंडांच्या विषयावरील परिचय ग्रंथ तत्कालिन अध्यक्ष डॉ. श्रीकांत जिचकार यांनी प्रकाशित केला होता.
त्यावरील खंड हा २०११ आणि दुसरा खंड हा २०१४ मध्ये प्रकाशित झाला होता. त्यानंतर तिसरा खंड हा २०१९ मध्ये ई-आवृत्तीत आला होता, परंतू तेा परिपूर्ण नव्हता आता त्यातील सर्व नोंदीही पूर्ण झाल्या आहेत.
यामुळे तिसरा आणि चौथा या दोन खंडाच्या ई-लोकार्पणचा सोहळा लवकरच केला जाणार आहे. त्यानंतर ही दोन्हीही खंड पुस्तक रूपाने येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली.
कुमार कोशाच्या या चारही भागात जीवसृष्टी आणि पर्यावरण संदर्भातील परिपूर्ण अशी माहिती, संदर्भ आहेत. २१ व्या शतकातील महत्त्वाचे बदल, मानवी अस्तित्व, पर्यावरणाचे प्रश्न, त्यातील होत असलेले बदल आणि त्याच्या परिणामांवरील अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत.
यासाठी मंडळाच्या तज्ज्ञांसह इतर संशोधक, तसेच मुंबईतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे सहकार्य लाभले आहे. तज्ज्ञांनी यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. कुमार कोशाच्या या एकूण चार भागात अंकुरण ते ज्ञानेंद्रिय या विषयावरील १ हजार २५ नोंदी आहेत.
मूळ संकल्पना लक्ष्मणशास्त्री जोशी यांची
मराठी विश्वकोश मंडळाची स्थापना आणि त्याच्या उभारणीत अत्यंत महत्वाचे योगदान देणारे संस्कृतपंडित लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीच आपल्या काळात कुमार कोश आणि बालकोषाची संकल्पना मांडून त्याची योजना आखली होती.
त्यानंतर या योजनेला आकार देण्याचे काम प्रा. मेघश्याम रेगे, प्रा. रावसाहेब जाधव आदींनी आकार द्यायला सुरूवात केली हेाती. जाधव यांच्याच काळात या विषयाच्या परिचय ग्रंथाला सुरूवात झाली होती. तो ग्रंथ २००३ मध्ये श्रीकांत जिचकार यांच्या काळात प्रसिद्ध झाला हेाता. त्यानंतर डॉ. विजया वाड, दिलीप करंबेळकर यांच्या काळात पुढील कामकाज सुरू होते.
ऑगस्ट महिन्यात ई - आवृत्ती
कुमार कोशाच्या तिसऱ्या आणि चौथ्या खंडाच्या ई - आवृत्ती चा लोकार्पण सोहळा मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंडळाकडून वेळ मागण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
लवकरच वेळ मिळेल, आणि हा लोकार्पण सोहळा पार पडेल. त्यांनतर काही महिन्यात या दोन्ही आवृत्तीचे पुस्तके प्रकाशित केली जाणार असून त्याचे नियोजन मंडळाने केले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिक्षित यांनी सांगितले.
संशोधक, विद्यार्थ्यासाठी उपयोगी
कुमार कोशाचे सर्व खंड हे नववी ते बारावी आणि त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी आणि त्यांच्या ज्ञानात अत्यंत मोठी भर पडेल अशी आहेत.त्यात अनेक नोंदी, विषयाच्या संज्ञा, अर्थ, संदर्भ, वैज्ञानिक आधार आणि इतर पूरक माहिती मिळणार आहे. त्यासोबत शिक्षक, संशोधक यांनाही हे खंड अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे.
मुखपृष्ठ शालेय विद्यार्थिनीचे
कुमार कोशाच्या मुखपृष्ठ्चे चित्र हे यशश्री कांबळी या विद्यार्थिनीने काढले असून तेच चित्र मंडळाने ठेवले आहे. त्यासाठी शालेय स्तरावर युवा चित्रकारांची स्पर्धा घेऊन त्यातून कांबळी हीचे चित्र निवडण्यात आले होते.
अशा आहेत नोंदी
वर्ष - भाग नोंदी
२००३ परिचय ग्रंथ मूळ विषयाची रूपरेखा
२०११ भाग-१ अंकुरण ते ग्लुकोज
२०१४ भाग-२ घटसर्प ते पॅरामिशीयम
२०१९ भाग-३ पांगारा ते लाजाळू (अपूर्ण हेाता)
२०२३ भाग-३, ४ लिंबू ते ज्ञानेंद्रिये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.