कल्याण-बदलापूर या महामार्गावरील वेलकम गेट जवळ, शांतीनगर येथे उभारण्यात आलेले विनापरवानगी अनधिकृत होर्डिंग्ज कापून काढण्यात आले आहे.
उल्हासनगर : घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर (Ghatkopar Hoarding Case) उल्हासनगरातील अनधिकृत होर्डिंग्ज महानगरपालिकेच्या (Ulhasnagar Municipal Corporation) रडारवर आले आहेत. 47 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून 21 तारखेला विनापरवाना होर्डिंग गॅस कटरने कापून काढण्यात आले आहे.
13 मे रोजी आलेल्या वारा-वादळामुळे घाटकोपर येथे उंच इमारतीवरील होर्डिंग कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानीची घटना घडली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेणारे आयुक्त अजीज शेख (Aziz Shaikh) यांनी मान्सूनपूर्व कालावधीत अशा दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ नये म्हणून उल्हासनगर महागनरपालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंग-जाहिरात फलकांचे संरचनात्मक परीक्षण करण्यात यावे, तसेच अवैध व धोकादायक असणारे होर्डिंग तातडीने निष्कासनाची कार्यवाही करुन संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश शेख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त तथा प्रभाग समिती अधिकारी गणेश शिंपी, मनीष हिवरे, अनिल खतुरानी, दत्तात्रय जाधव यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व जाहिरात होर्डिंग्जचे संरचनात्मक परीक्षण करण्यासाठी व बेकायदेशिर होर्डिंग हटवण्याकरिता 47 जणांना नोटिसा बजावल्या होत्या.
तसेच कल्याण-बदलापूर या महामार्गावरील वेलकम गेट जवळ, शांतीनगर येथे उभारण्यात आलेले विनापरवानगी अनधिकृत होर्डिंग्ज कापून काढण्यात आले आहे. यापुढे महानगरपालिका क्षेत्रातील विनापरवानगी अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलकांवर दैनंदिन धडक कारवाई सुरु ठेवण्याचे आदेश आयुक्त अजीज शेख यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.