Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत सापडले आणखी दोन मृतदेह! 14 वरून आकडा पोहचला 16 वर... काही जण  अडकल्याची भिती

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर इथं पेट्रोलपंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगमुळं १६ जणांचा मृत्यू झाला तर ८८ जण जखमी झाले आहेत. अद्याप या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
Ghatkopar Hoarding Collapse
Ghatkopar Hoarding CollapseEsakal
Updated on

घाटकोपर इथं पेट्रोलपंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगमुळं मृत्यू झालेल्यांची संख्या आता १६ वरती पोहोचली आहे. तर ८८ जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू असताना आज सकाळी आणखी दोन मृतदेह सापडले आहे. त्यामुळे ही संख्या आता १६ वर पोहोचली आहे. अद्याप या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. तर आणखी काही लोक या होर्डिंगखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेला ४० तास उलटून गेले आहेत. अद्याप घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे गॅस कटरचा वापर न करता बचावकार्य सुरु आहे. पेट्रोल पंपामुळे काळजी घेऊन बचावकार्यातील पथक काम करत आहे.

Ghatkopar Hoarding Collapse
Ghatkopar Hoarding Collapse : होर्डिंग दुर्घटनेवरून आरोप-प्रत्यारोप ; आरोपी भिंडेचे उद्धव ठाकरेंसोबतचे छायाचित्र शेअर

सर्व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई, मुंबई महापालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई महानगरात जाहिरात फलक (होर्डिंग) प्रदर्शित करण्यासाठी पालिकेचा परवाना घेतलेला नाही, अशा सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. घाटकोपर येथील छेडानगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली त्या ठिकाणी आयुक्त गगराणी यांनी आज भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. संपूर्ण परिसराची पाहणी करतानाच संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी दुर्घटनेशी संबंधित तपशील जाणून घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

Ghatkopar Hoarding Collapse
Ghatkopar Hoarding Collapse: होर्डिंग कोसळलेल्या पेट्रोल पंपाला लागली आग, तब्बल ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच

गगराणी म्हणाले की, पालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त यांना देण्यात आले आहेत. विनापरवाना तसेच धोकादायक स्थितीतील जाहिरात फलकांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. छेडानगर येथील दुर्घटना घडलेल्या ठिकाणी असलेले अन्य तीन अनधिकृत होर्डिंगवरदेखील तत्काळ निष्कासन कारवाई करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक उभारल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई सुरू केल्याचे ते म्हणाले.

परवानगी बंधनकारक

जमीन मालकी कोणाचीही असली, तरीही व्यवसायासाठी परवाना घेऊनच जाहिरात फलक लावणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट करून लोहमार्ग पोलिस आयुक्तांच्या जागेतील जाहिरात फलक व परवाना या मुद्द्यावर वेळोवेळी पत्रव्यवहार करून प्रशासनाने पाठपुरावा केल्याचेही आयुक्त भूषण गगराणी म्हणाले.

Ghatkopar Hoarding Collapse
Ghatkopar Hoarding Collapse: भावेश भिंडे कोणाचा पार्टनर? घाटकोपरच्या दुर्घटनेवरून नितेश राणे यांचे गंभीर आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.