कोरोनात आई गेली...आता होर्डिंग दुर्घटनेमध्ये २१ वर्षीय कमावता भरत गेला, राठोड कुटुंबावर काळाचा घाला

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर आता तेथे बचावकार्य सुरू आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान दिसत आहे.
Ghatkopar Hoarding Collapse
Ghatkopar Hoarding Collapse esakal
Updated on

Ghatkopar Hoarding Collapse:

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू  झाला आहे. कुटुंबाचा कमावता आधार गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गेला असता काळाने घात केला. भरत राठोड असं या तरुणाचं नाव आहे.

भरत राठोड पेट्रोल भरण्यासाठी आला होता. मात्र जोराचा वार आणि पावासामुळे तो पेट्रोल पंप परिसरात आसरा घेण्यासाठी थांबला. यानंतर जोराचा वारा आला आणि पंपावर होर्डिंग कोसळलं. यामुळे भरतचा मृत्यू झाला. घाटकोपर दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७४ जण जखमी आहेत. अजूनही एनडीआरएफ पथक शोध मोहिम राबवत आहे.

भरत जाधव हा घरातील मोठा मुलगा होता. कुटुंबाचा तो आधार होता. त्याच्या घरची परिस्थीती खूप गंभीर आहे, घरी कमावणारं देखील कोणी नाही. त्याला एक छोटा भाऊ आहे. त्याच्या वडिलांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या आईचे कोरानात निधन झाले. त्यामुळे भरत कमावणारा एकटाच होता. सरकारने यंत्रणा चांगली ठेवली असती तर आज ही दुर्घटना घडली नसती, असे भरतच्या नातेवाईकांनी बोलून दाखवले आहे.

अचानक आलेल्या वादळ आणि अवकाळी पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अपघातग्रस्त भागाचा आढावा घेतला. परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. अनेक वाहनांवर होर्डिंगही पडले असून त्यामुळे त्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. हा अपघात किती भीषण असेल हे व्हिडिओ पाहून स्पष्ट होते. सर्वत्र विनाश दिसत आहे.

Ghatkopar Hoarding Collapse
"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसान भरपाई जाहीर करताना मुंबईतील सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याचे निर्देशही दिले आहेत. मृतांसाठी नुकसान भरपाईची घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, जखमींवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था केली जात आहे. होर्डिंग लावणाऱ्यांनी सुरक्षा नियमांचे पालन केले की नाही याचीही चौकशी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अवकाळी पाऊस आणि पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी बहुतांश शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गाड्या वेळेवर उशिरा आल्या आणि मुंबईहून निघाल्या. विमानतळाचा काही भागही जलमय झाला होता.

Ghatkopar Hoarding Collapse
Ghatkopar Hoarding Collapse Update: 'ते' १४ जणांचा जीव घेणारे होर्डिंग बेकायदेशीर; BMCने दिली माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.