Badlapur Case : कसाबने एवढे लोक मारले तरी...महाजनांचं बदलापूर प्रकरणात फाशीच्या मागणीवर स्पष्टीकरण, आंदोलनावर तोडगा नाहीच

Girish Mahajan reacts to protestors in Badlapur sexual assault case : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.
Girish Mahajan on protestors in Badlapur sexual assault case
Girish Mahajan on protestors in Badlapur sexual assault case
Updated on

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर बदलापुरात नागरिकांचा उद्रेक झाला असून त्यांनी रेल्वे ट्रॅकवर ठिय्या आंदोलन केलं आहे. आंदोलनकर्त्यांकडून या घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळावर जाऊन आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.