Ulhasnagar News : सौचालयाच्या भांड्यात टाकलेल्या चिमुकलीला बालकल्याण समितीने घेतले कुशीत

काही तासाच्या स्त्री जातीच्या नवजात जिवंत अर्भकाला सार्वजनिक सौचालयाच्या भांड्यात टाकण्यात आल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना काल मंगळवारी उल्हासनगरात उघडकीस आली.
New Born baby
New Born babySakal
Updated on

उल्हासनगर - काही तासाच्या स्त्री जातीच्या नवजात जिवंत अर्भकाला सार्वजनिक सौचालयाच्या भांड्यात टाकण्यात आल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना काल मंगळवारी उल्हासनगरात उघडकीस आली होती. या चिमुकलीला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आज ठाणे बालकल्याण समितीने भेट देऊन तिला कुशीत घेतले आहे.

ठाणे बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राणी बैसाणे, सदस्य ऍडव्होकेट मनीषा झेंडे यांनी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात भेट दिली असून रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंतराव मोरे यांच्याकडे चिमुकलीच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तसेच चिमुकलीला कुशीत घेतले आहे.

डॉक्टरांनी तात्काळ उपचारास सुरवात केल्याने चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. प्रकृतीचा उत्तम रिपोर्ट प्राप्त झाल्यावर तिचा ताबा घेण्यात येणार आणि तिला बाल संगोपन केंद्रात ठेवण्यात येणार असल्याची माहिती राणी बैसाणे, ऍडव्होकेट मनीषा झेंडे यांनी दिली.

कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी परिसरातील आम्रपालीनगर येथील सार्वजनिक सौचालयात एका महिलेला सौचालयाच्या भांड्यात एक नवजात अर्भक असल्याचे दिसले असल्याचे दिसले. तिने शेजारच्यांना सांगितल्यावर नागरिकांनी स्त्री जातीच्या अर्भकाला बाहेर काढले.आणि संदीप डोंगरे, प्रकाश भागे, प्रवीण सुर्यवंशी यांनी उपचारासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ञ डॉ. वसंतराव मोरे यांनी तात्काळ अर्भकावर उपचार सुरु केले. हे अर्भक 8 तासाच्या आतील असून त्याचे वजन 2 किलो 130 ग्रॅम आहे. अर्भकाला रुग्णालयात आणले तेंव्हा त्याची नाळ बांधलेली नव्हती. तसेच त्याचे शरीर पूर्णतः थंड पडले होते. मात्र तात्काळ उपचार सुरु केल्याने आता अर्भकाची स्थिर आहे.

याबाबत याबाबत संदीप डोंगरे यांनी विठ्ठलवाडी ठाण्यात तक्रार केल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडस नवजात चिमुकलीला सौचालयाच्या भांड्यात टाकणाऱ्या निर्दयी मातेचा शोध करण्यास सुरुवात केली आहे. आम्रपाली नगरातील सौचालयात ही चिमुकली सापडल्याने नागरिकांनी तिचे नाव आम्रपाली ठेवले आहे.

दरम्यान 30 डिसेंबर 2018 मध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत नाल्यात जिवंत टाकण्यात आलेल्या अर्भकाला अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडे यांनी वाचवले होते. रगडे यांनी या बेवारस अर्भकाचे नाव टायगर ठेवले होते. शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यावर इटली मधील दाम्पत्याने टायगरला दत्तक घेतले आहे. सौचालयाच्या भांड्यात टाकण्यात आलेली बेवारस चिमुकली देखील अतिशय गोंडस असल्याने तिला दत्तक घेण्यासाठी नागरिक पुढे येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.