Manoj Jarange: "सरसकट आरक्षण द्या अन्यथा रक्ताचे नातेवाईक कोण हे स्पष्ट करा"; जरांगेंचा उपसमितीच्या बैठकीत सवाल

मराठा आरक्षणविषयक उपसमितीच्या बैठकीला जरांगे व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे उपस्थित आहेत.
Manoj Jarange
Manoj Jarange
Updated on

मुंबई : मराठा आरक्षणविषयक उपसमितीच्या बैठकीला जरांगे व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे उपस्थित आहेत. या बैठकीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच सरसकट आरक्षाच्या मागणीचा पुनरुच्चार करताना सरसकट आरक्षण द्या अन्यथा सगेसोयरे कोण हे स्पष्ट करा अशी मागणी केली. (Give immediate reservation otherwise clarify who are blood relatives says Manoj Jarange in sub committee meeting)

Manoj Jarange
NCP MLA Disqualification: राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रेवर ३१ जानेवारीपूर्वी येणार निकाल; गुरुवारपासून सुनावणीला सुरुवात

...अन्यथा रक्ताचे नातेवाई कोण? हे सिद्ध करा

मनोज जरांगे म्हणाले, "अहवालात ८३ क्रमांकावर मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या ओबीसी यादीत आहेत. महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या नोंदींवरुन महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण द्या. दुसरा मुद्दा कोणाला कुणबी प्रमाणपत्र घ्यायची जोरजबरदस्ती नाही ज्याला घ्यायचं त्यांनी घ्यावं. (Latest Marathi News)

तिसरा मुद्दा मुंबई सरकारचं गॅझेट, हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थानच्या खानेसुपारीचा अहवालही सांगतो की, मराठा आणि कुणबी एकच असल्याचं. हे चार पुरावे तुम्हाला दिलेत यावरुन मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सिद्ध होतं. त्यामुळं एका शासननिर्णयाद्वारे मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण जाहीर करावं. (Marathi Tajya Batmya)

Manoj Jarange
Truck Drivers Strike: सरकारनं कृषी कायद्यांसारखं करु नये, संध्याकाळपर्यंत...; ट्रक मालक संघटनेचा इशारा

५४ लाख नोंदी जुन्या की नवीन?

किंवा आपले जे चार शब्द ठरले आहेत. सगेसोयरे रक्ताचे असणारे या नोंदींच्या आधारे हे शब्द शासननिर्णयात घ्या आम्हाला ते मान्य आहे. तसेच चौथा मुद्दा असा की, या ५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत त्या नव्या आहेत की जुन्या आहेत, ते सरकारनं सांगावं, अशीही जरांगेंनी यावेळी उपसमितीच्या बैठकीत मागणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()