निसर्ग चक्रीवादळ: मुक्या प्राण्यांना जपा, त्यांना आसरा द्या; प्राणीमित्रांचं आवाहन 

helping animals
helping animals
Updated on

मुंबई: आज सकाळपासून निसर्ग चक्रिवादळ महाराष्ट्रावर गोंगावत आहे. ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. अश्यातच मुक्या प्राण्यांची काळजी घ्या असे आवाहन प्राणी मित्रांनी केले आहे. 

मुके प्राणी घाबरुन तुमच्या घरात, कॉलनीत आसरा घ्यायला येतील तर न हाकलता घरात, कॉलनीत घ्या. त्यांना असरा द्या, असंही आवाहन प्राणीप्रेमी करत आहेत. चक्रिवादळाचा फटका माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांना देखील बसणार आहे. 

याशिवाय, चक्रिवादळामुळे समुद्र किनाऱ्यांवर कासव, डॉल्फिन, व्हेल किंवा सागरी जीव वाहून येऊ शकतात. जर तुम्हाला असं काही निदर्शनास आलं तर याबाबतची माहिती वनविभाग खात्याला द्या, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. निसर्ग चक्रिवादळात घराबाहेर न पडता पाळिव प्राण्यांची ही काळजी घ्या. 

घराची दारे, खिडक्या लावून घ्या जेणेकरुन घरचे प्राणी बिथरणार नाहित याची काळजी घ्या. निसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना होणार आहे. त्याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागही या वादळाच्या पट्ट्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, सुरत तसंच दमण, दादरा नगर हवेली भागालाही निसर्ग वादळाचा फटका बसू शकतो. या संपूर्ण भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळासोबतच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

यामुळे मुंबईत पूरस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल सज्ज झाली आहेत. त्यामूळे, आपणही घरी राहून स्वत: ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

give shelters and help animals during cyclone said animal lovers read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.