सर्वात मोठी बातमी : कोरोनावर आली गोळी, किंमत १०३ रुपये; मुंबईत होणार उत्पादन...

सर्वात मोठी बातमी : कोरोनावर आली गोळी, किंमत १०३ रुपये; मुंबईत होणार उत्पादन...
Updated on

मुंबई - भारतात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरलाय. दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. शुक्रवारी देशात सर्वाधिक म्हणजे १४ हजारांवर कोरोना रुग्ण आढळलेत या सर्व संवेदनशील स्थितीत मुंबईतून एक चांगली बातमी समोर येतेय. मुंबईतील ग्लेनमार्क फार्मासुटिकल्स या कंपनीला कोरोनावरील उपचारासाठीची गोळी तयार करण्याची परवानगी मिळालीये. DCGI म्हणजेच ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मुंबईस्थित ग्लेनमार्कला ही परवानगी देऊ केलीये.

या कंपनीत उत्पादित करण्यात येणाऱ्या गोळ्या या कोरोनाची प्राथमिक लक्षणं असणाऱ्यांना देण्यात येणार आहेत अँटिव्हायरल औषध असणाऱ्या व्हिपिरावीरला फॅबिफ्लू या नावाने मार्केटमध्ये आणलं जाणार आहे. दरम्यान बाजारात आणण्याआधी १ हजार रुग्णांवर त्याचा प्रयोग करून पहिला जाणार आहे. ग्लेनमार्क फार्मासुटिकल्स या कंपनीला या औषधाचं उत्पादन आणि मार्केटिंग यांची परवानगी मिळाल्याचा दावा ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने केलाय.

दरम्यान जगभरात  कोरोनाची दुसरी लाट येणार असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हंटलंय. अशात पुढील दोन आठवड्यात जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळेल असा इशारा WHO ने दिलाय. कंपनीच्या माहितीप्रमाणे ग्लेनमार्क ही कंपनी देशातील आरोग्य यंत्रणा आणि सरकारसोबत मिळून काम करणार आहे. यामुळे देशातील प्रत्येकाला सहजतेने हे औषध उपलब्ध होऊ शकेल. या 'फॅबिफ्लू'च्या एका गोळीची किंमत १०३ रुपये असणार आहे. 

जे रुग्ण कोरोनाच्या प्राथमिक टप्प्यात आहेत अशाना ही गोळी प्रिस्किप्शनवर मिळणार दिली जाईल. यामध्ये पहिल्या दिवशी १८०० mg चे दोन डोस आणि त्यानंतर पुढील १४ दिवस ८०० mg चे दोन डोस दिले जातील. कंपनीच्या माहितीप्रमाणे डायबिटीस किंवा हृदयविकार असलेले पण प्राथमिक स्टेजमधील कोरोना रुग्ण या गोळ्या घेऊ शकतात. 

Glenmark pharmaceuticals launches Covid Drug with the name of fabi flu

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.