गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्यात जाताय? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची

ganpati
ganpati
Updated on

अलिबाग : गणेशोत्सवानिमित्ताने रायगड जिल्ह्यात येणाऱ्यांना दहा दिवसाचे क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. त्याचबरोबर 12 ऑगस्टनंतर  कोकणात येण्यासाठी ई-पास सक्तीचे करण्यात आलेले असून यासाठी कोव्हीड स्वॅब तपासणी अहवाल जोडणे गरजेचे आहे. गर्दी टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही ग्रामसमित्यांची राहणार असून कोव्हीडची साथ रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवार (ता. 10) लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. गणेशोत्सव 22 ऑगस्टपासून सुरु होत असून यासाठी 12 ऑगस्टनंतर  जिल्ह्यात येणाऱ्यांना ई-पास बंधनकारक राहणार आहे. ई-पास काढत असतानाच स्वॅब टेस्ट केल्याचे आरोग्य प्रमामपत्र जोडावे लागणार आहे. याच दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांसाठी अँटीजन, अँटीबॉडी टेस्टची सुविधा सुरु केली जाणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आठवडाभरातच अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात कोव्हीड तपासणी प्रयोगशाळा सुरु होणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी इतर सुविधांचाही आढावा घेतला.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून यासाठी रोहा,  माणगाव रेल्वेस्थानकात या रेल्वे थांबणार आहेत. या संदर्भातील वेळापत्रक तयार करण्यात आले असून बुकींग सुविधा सुरु झालेली आहे. पावसामुळे थांबलेल्या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सुचना कंत्राटदाराला देण्यात आलेल्या आहेत. कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव  उस्ताहात साजरा करता येणार नसल्याबद्दल अदिती तटकरे यांनी गणेशभक्तांची दिलगीरी व्यक्त केली आहे. शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत, ते सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करुनच केलेले आहेत. या नियमांची अंमलबजावणी गाव पातळीवर करण्याची जबाबदारी ग्राम समित्यांची असणार आहे.

गणेशोत्सवानिमित्ताने दरवर्षी जो खर्च सांस्कृतिक कार्यक्रमावर केला जातो, त्याबदल्यात आरोग्य शिबीरे, जनजागृती अभियान काढणे उचित ठरेल, त्याचबरोबर गणपतीचे आगमण किंवा विसर्जनाच्या मिरवणुकीत लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना न घेता कमीत कमी गर्दी करुन गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीसाठी खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी हे प्रत्यक्ष उपस्थित होते तर ऑनलाईन खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, आमदार बाळाराम पाटील, आमदार रवीशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेतला होता.

(संपादन : वैभव गाटे)

goes to raigad district for Ganeshotsav read detail story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.