मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने डीआरआयने जमीन मार्ग देशात सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. वाराणसी, नागपूर आणि मुंबई येथे शुक्रवार शनिवारी 2 दिवस डीआरआईने तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत 31.7 किलोचे सुमारे 19 कोटी रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले.
डीआरआयने केलेल्या कारवाईत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी 5 आरोपी मुंबईतून ,2 वाराणसी 2 आणि नागपुरात 4 तस्करांना अटक करण्यात आली.बांगलादेशच्या सीमेवरून भारतात आणलेल्या सोन्याची तस्करी करण्यात सिंडीकेट कार्यरत होते. तसेच त्यांनी तस्करांचे देशभर नेटवर्क तयार केले होते.
डीआरआईची कारवाई
गुप्तचर माहितीदारांकडून डीआरआय पथकाला सिंडीकेट संदर्भात माहिती मिळाली होती. त्यावर डीआरआयने पथक तयार करून कारवाई सुरू केली.पहिल्या कारवाईत कोलकाता येथून निघालेल्या ट्रेनमधून नागपूर रेल्वे स्थानकावर उतरताना डीआरआय नागपूर पथकाने सोन्याच्या 2 तस्करांना पकडले.
त्यांच्याकडून 8.5 किलो सोने जप्त करण्यात आले. त्यांच्या चौकशीतून तस्करीच्या सोने स्वीकारण्यासाठी येणाऱ्या 2 आरोपीची ओळख पटवून पकडण्यात आले. दुसऱ्या कारवाईत वाराणसी टीमने 3 तासांच्या नाट्यमय पाठलागानंतर आणि जंगलात शोध मोहिमेनंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने 2 आरोपींना पकडण्यात यश मिळविले.
आरोपींनी कारच्या हँड ब्रेकच्या खाली बनवलेल्या पोकळीतून सुमारे 18.2 किलो सोने जप्त करण्यात आले.तिसऱ्या कारवाईत वाराणसीहून रेल्वेने सोने घेऊन निघालेल्या 5 आरोपींना मुंबईत पकडण्यात डीआरआई मुंबई टीमला यश आले. त्यांच्याकडून एकूण 4.9 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.अशाप्रकारे देशात पसरलेल्या सोन्याच्या तस्करीचे सिंडीकेट उध्वस्त करण्यात डीआरआयला यश आले आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.