मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, यंदा सतावणार नाही 'ही' कटकट

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, यंदा सतावणार नाही 'ही' कटकट
Updated on

मुंबई - कोरोनाचा प्रार्दुभाव मुंबईत सर्वाधिक आहे. त्यात मुंबई शहर हे रेड झोनमध्ये आहे. या संकटाच्या काळात मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पुरेसा जलसाठा असल्यानं यंदा पाणी कपातीची समस्या नागरिकांना उद्भवणार नाही. जुलै महिन्यापर्यत पुरेल इतका पाणीसाठा तलावांमध्ये आहे. 

तलावांमध्ये इतका आहे पाणीसाठा 

सध्या सातही तलावांत मिळून 431418 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. मुंबईला दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतं. हा पाणीपुरवठा पाहता उपलब्ध असणारे पाणी जुलै महिन्यापर्यंत पूरेल.

मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून हा पाणीपुरवठा होत असतो. मात्र 2018 मध्ये पाऊस कमी झाल्यामुळे गेल्या वर्षी मुंबईकरांना काही दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. दरम्यान गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर जुलै 2019 मध्ये पाणीकपात रद्द करण्यात आली होती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. 

गेल्या दोन वर्षांची स्थिती पाहता यावर्षी मुंबईकरांसाठी पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीकपात करावी लागणार नाही असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट केलं आहे. 

तलाव क्षेत्रातील पाणीसाठ्यावर एक नजर टाकूया 

  • सध्याच्या स्थितीत तलाव क्षेत्रात एकूण 3 लाख 90 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा.
  • गेल्यावर्षी मे महिन्यात केवळ 15 ते 18 टक्के पाणीसाठा तलावांमध्ये होता. 
  • यावर्षी आणखी तीन महिने म्हणजे जुलै- ऑगस्टपर्यंत पुरेसा असा पाणीसाठा तलावांमध्ये उपलब्ध. 
  • पाणीसाठा पुरेसा असल्यानं पालिकेवर यंदा पाणीकपात करण्याची वेळ येणार नाही आहे. 

लॉकडाऊनमध्ये पाण्याची मोठी बचत 

मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 100 ते 150 किमीवरून पाईपलाईनने पाणी आणण्यात येतं. हे पाणी 24 विभागांत असणार्‍या टेकड्यांवरील भूमिगत जलाशयातून त्या त्या विभागात पुरवण्यात येतं. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्याला लागणारे 15 टक्के पाणी टाक्यांमधील रिझर्व्ह कोट्यात शिल्लक राहत आहे. याचा फायदाही मुंबईकरांना होणार आहे. 

मुंबईला दररोज 3 हजार 800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यापैकी सुमारे 900 दशलक्ष लिटर चोरी तसेच गळतीमुळे वाया जाते. पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबरला तलावांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जातो. यावेळी सातही धरणांत मिळून 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. 2 ऑगस्ट 2019 ला तलावांत 12,75,017 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला होता.

good news for all mumbaikar there wont be water cut in this summer

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.