मुंबई, ता. 4 : मुंबईतील सर्वात जास्त दाटीवाटीची लोकवस्ती असलेलं ठिकाण म्हणजेच धारावी. धारावीची लोकसंख्या साधारण साडे आठ लाख इतकी आहे. एकेकाळी धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट होता. मात्र आता हीच धारावी कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोहोचली असून धारावीमध्ये नवे रुग्ण तसेच मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेला यश आल्याचे दिसते.
महत्त्वाची बातमी : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू तारिक परवीनच्या पुतण्याला अटक
धारावीमध्ये आज दिवसभरात केवळ 1 नवीन रूग्ण सापडला असून धारावीतील एकूण रूग्णसंख्या 3,569 इतकी झाली आहे. तर सध्या 90 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आज केवळ 23 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली.
दादरमध्ये आज 12 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 4,366 इतकी झाली आहे. तर 178 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर माहीममध्ये आज 10 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 4,108 इतकी झाली आहे. तर 334 ऍक्टिव्ह रूग्ण आहेत.
महत्त्वाची बातमी : मुंबईतील पुढचा कोविड पिक येईल तो आधीपेक्षा कमी असेल, TIFRचं संशोधन
तर धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात आज 23 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 12,043 वर पोहोचला आहे. तर 606 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आतापर्यंत 606 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3,170,दादरमध्ये 4,022 तर माहीममध्ये 3636 असे एकूण 10,779 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
( संपादन - सुमित बागुल )
good news coming from dharavi only one covid positive found in last 24 hours
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.