कोरोना चाचणीच्या शुल्काविषयी आली दिलासादायक बातमी! खासगी प्रयोगशाळेतील शुल्क कमी होणार?

कोरोना चाचणीच्या शुल्काविषयी आली दिलासादायक बातमी! खासगी प्रयोगशाळेतील शुल्क कमी होणार?
Updated on

मुंबई : राज्यातील कोविड19 ची चाचणी करणाऱ्या खासगी प्रयोगशाळांतील दर कमी होणार आहेत. हे दर कमी करण्याचे निर्देश आयसीएमआरने राज्य सरकारला दिले आहेत. राज्यातील चार सदस्यांची समिती गठीत करण्यात आली असून ही समिती नवे दर निश्चित करणार आहे. आठवड्याभरात हे दर कमी होण्याची शक्यता आहे.

राज्यात कोविड19 विषाणूंचा वाढता प्रदर्भाव लक्षात घेता आयसीएमआर या संस्थेने दिनांक 2 मे रोजी अखेर RT-PCR तपासणीची सुविधा असणाऱ्या 44 शासकीय आणि 36 खासगी प्रायोगशाळांना कोविड19 च्या तपासणीची मान्यता दिली आहे. प्रयोगशाळा निहाय तपासणी क्षमता व प्रत्यक्षात करण्यात येणाऱ्या तपासण्या तसेच प्रयोगशाळांंमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणारे तपासणी नमुने, प्रयोगशाळांवरील तपासणीचा भार या सर्व बाबींचा आढावा मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज घेतला.

सर्वात मोठी बातमी - मुंबईतील चेंबूर परिसरातील केमिकल कंपनीतून विषारी वायू गळती

शासकीय प्रयोगशाळांमध्ये कोविड 19 च्या चाचण्या निशुल्क करण्यात येत आहेत. खासगी प्रयोगशाळांसाठी आयसीएमआर ने 4,500 इतका तपासणी दर निश्चित केला होता. या काळात तपासणीसाठी लागणारे तपासणी किट परदेशातून आयात करावे लागत होते. तथापि या चाचण्यांसाठी आवश्यक असणाऱ्या तपासणी किटची आता भारतात निर्मिती होत असून ते गरजेनुसार उपलब्ध आहेत. त्यामुळे मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांशी वाटाघाटी करून राज्यात कोविड 19 तपासणीसाठी दर निश्चित करण्याबाबत आयसीएमआर ने 25 मे रोजी राज्य शासनास कळवले. त्यानुसार हे कमी दर आता निश्चित होणार आहेत.

राज्यातील प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी व जास्तीत जास्त चाचण्या होण्यासाठी खासगी प्रायोगशाळांसोबत वाटाघाटी करून कमीतकमी दर निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यात आता आयसीएमआर ने दर निश्चितीसाठी समिती गठीत करण्यास सांगितले आहे. त्यानुसार राज्यातील आयसीएमआर मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांचे कोविड 19 निदान चाचणीचे शुल्क निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. 

मान्यताप्राप्त प्रयोगशाळांंसोबत चर्चा
राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे , वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सह संचालक अजय चंदनवाले , ग्रांट वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्राध्यापिका अमिता जोशी , आरोग्य सेवा आयुक्तालयाचे संचालक यांचा या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती राज्यातील मान्यताप्राप्त प्रयोगशाळांंसोबत लवकरच चर्चा करणार आहे. त्यानंतर हे नवे दर निश्चित करण्यात येणार आहेत. पुढील आठवड्याभरात हे नवे दर निश्चित होऊन लागू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.