मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! तुम्ही वाचली का?

सध्या कोरोनामुळे मुंबईत नकारात्मक वातावरण आहे. पण अशातच एक दिलासा देणारी गोष्टही घडली आहे.
Mumbaikars
MumbaikarsSocial-Media
Updated on
Summary

सध्या कोरोनामुळे मुंबईत नकारात्मक वातावरण आहे. पण अशातच एक दिलासा देणारी गोष्टही घडली आहे.

मुंबई: गेले काही महिने मुंबईसाठी (Mumbai) अत्यंत कठीण होते. शहरात कोरोना रूग्णांची (Covid19 Active Cases) संख्या झपाट्याने वाढत होती. पण संपूर्ण लॉकडाउननंतर (Lockdown) अखेर मुंबईची रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. त्यात आनंदाची बातमी म्हणजे, मुंबईचा कोरोना (Coronavirus) रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होऊन 0.46 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा (Doubling Rate) कालावधीदेखील कमी होऊन 145 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईत नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. (Good News for Mumbaikars as Coronavirus under control after strict lockdown)

Mumbaikars
मुंबईत कोरोना नियंत्रणाच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

आतापर्यंत 56 लाख 77 हजार 780 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 48 हजार 484 वर आला आहे. नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याने रुग्णवाढीचा दर 0.46 पर्यंत खाली आला आहे. आज 2 हजार 678 नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 6 लाख 74 हजार 72 इतकी झाली आहे. मुंबईत एका दिवसात 3 हजार 608 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6 लाख 10 हजार 43 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 48 हजार 484 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Mumbaikars
राजकीय आरोप झेलत BMC आयुक्त चहल यांची वर्षपुर्ती

मुंबईत सध्या 93 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 581 इतकी आहे. धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून धारावीतील एकूण रुग्णसंख्या 6 हजार 610 वर पोहोचली आहे. दादर मध्येही रुग्णांची संख्या 9 हजार113 इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.