Break the Chain: मुंबईचा अखेर पहिल्या स्तरात समावेश

पॉझिटिव्हिटी रेट घसरला; सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनच्या निर्णयाकडे लक्ष
Break the Chain: मुंबईचा अखेर पहिल्या स्तरात समावेश
Updated on

पॉझिटिव्हिटी रेट घसरला; सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई: राज्यातील ब्रेक द चेनच्या (Break the Chain) नियमाअंतर्गत 'अनलॉक'च्या (Unlock) प्रक्रियेत मुंबईचा (Mumbai) समावेश पहिल्या स्तरात झाला आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) आणखी घसरला असून आठवडाभरात पॉझिटिव्हिटी रेट ३.७९ टक्के इतका आहे. मागील आठवड्यात हा रेट ४.४० टक्के तर त्याआधीच्या आठवड्यात ५.२५ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट होता. तसेच, १२ हजार ५९३ पैकी ९ हजार ६२६ ऑक्सिजन बेड (Oxygen Beds) रिक्त आहेत. एकूण २ हजार ९६७ ऑक्सिजन बेडवर रुग्ण (२३.५६ टक्के) आहेत. मुंबईत सध्या तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू आहेत. मात्र, मुंबई पहिल्या स्तरात (1st Level) आली तर मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येईल, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली होती. त्यामुळे आता मुंबई पालिका (Mumbai BMC) शहरात पहिल्या किंवा दुसऱ्या स्तराचे निर्बंध लागू करणार का? याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. (Good News for Mumbaikars as Mumbai comes under 1st level general public waiting for local trains services)

Break the Chain: मुंबईचा अखेर पहिल्या स्तरात समावेश
प्रदीप शर्मांनंतर आणखी एक अधिकारी NIA च्या रडारवर

राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत नवीन यादी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. त्यामुळेच मुंबईसह अनेक जिल्हे पहिल्या स्तरावर आले आहेत. पहिल्या स्तरातील जिल्ह्यावर असे आहेत नियम...

- सर्व प्रकारची दुकानं पूर्ववत सुरु होणार. मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह नियमितपणे सुरु होणार.

- लोकल सेवा पूर्ववत होईल. मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध घालण्याची मुभा असेल.

- जिम, सलू, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली होतील.

- सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत होईल, इथे जमावबंदी नसेल.

- खासजी कार्यालये सुरु होती, तर शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरु होतील.

- विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल.

- लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधनं नसतील, या भागात जमावबंदी नसेल.

मात्र, मुंबईचा समावेश पहिल्या स्तरात झाला असला तरी अद्याप मुंबईत या सर्व सोयीसुविधा सुरू होणार की नाही, याबद्दल पालिकेकडून अधिकृत माहिती आलेली नाही.

Break the Chain: मुंबईचा अखेर पहिल्या स्तरात समावेश
Lockdown Effect: मुंबईत फेरीवाला बनला ड्रग्ज तस्कर

याशिवाय, त्यानुसार काही जिल्ह्यांचा स्तर बदलला आहे. अनेक जिल्हे तिसऱ्या स्तरात आले असून तेथे पुढील गोष्टींना परवानगी असणार आहे.

- अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील

- मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील

- हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.

- सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील

- खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील

- इनडोअर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील

- सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल

- सामाजित, सांस्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार)

-लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील.

- कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील.

- दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.