रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, एक दिलासादायक बातमी 

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, एक दिलासादायक बातमी 
Updated on

मुंबई ता. 21 : लाॅकडाऊन पुर्वी रेल्वेचे आगाऊ आरक्षण काढून ठेवलेल्या प्रवाशांचे आरक्षण रेल्वे मंत्रालयाने रद्द केले आहे. त्याचा परतावा प्रवाशांना घर बसल्या मिळवता येणार आहे. याचा सर्वात जास्त दिलासा, रेल्वे स्थानकांवरील खिडकीवर काढलेल्या आरक्षीत तिकीट धारकांना होणार आहे. त्यासाठी आयआरसीटीसीने 139 हा हेल्पलाईन क्रमांक रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिला असून, यावर फोन करून परतावा मिळवता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. 24 मार्च पासून हे लाॅकडाऊन सुरू झाले आहे. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने प्रिमियम गाड्या, मेल, एक्स्प्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, उपनगरी लोकल, डेमू,मेमु या सर्व सेवा बंद केल्या आहे. यादरम्यान ज्या नागरिकांनी रेल्वे स्थानकांवरून आरक्षीत तिकीट काढले असतील, अशा प्रवाशांना यापुर्वी परतावा मिळवण्यासाठी रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर जाऊन अर्ज करावा लागत होता. मात्र, ही गर्दी होऊ नये, यादृष्ट्रीने रेल्वेने, रद्द झालेल्या आरक्षीत तिकीटांचा परतावा त्यांच्या बँक अकांऊट मध्येच ऑनलाईन पाठवण्याची सोय केली आहे. 

आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन आरक्षीत तिकीट काढणाऱ्यांना त्यांचा परतावा ऑनलाईन मिळतो. मात्र, खिडकीवर तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना परतावा मिळवताना अडचणीला सामोरे जावे लागत होते. त्यात लाखो प्रवाशांच्या आरक्षीत तिकीटा रद्द झाल्याने, परतावा मिळवण्यासाठी प्रवाशांच्या लांबचलांब रांगा लागण्याची शक्यता असतांना, रेल्वेने हा परतावा ऑनलाईनच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने, खिडकीवरून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना सर्वात जास्त दिलासा मिळाला आहे. 

139 क्रमांकावर करावा लागणार फोन
रेल्वेचे आरक्षीत तिकीट रद्द झालेल्या प्रवाशांनी 139 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करायचा आहे.त्यावर दिलेल्या सुचनांचे पालन करून, अपेक्षीत माहिती त्यामध्ये द्यायची आहे. त्यानंतर आपल्या तिकीटचा परतावा मिऴवता येणार आहे.

good news from IRCTC now get reservation refund by dialing 139 helpline

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.