Railway Derailment: पनवेल-कळंबोली रेल्वे मार्गावर मालगाडीचे चार डबे घसरले; लांब पल्ल्याच्या 5 एक्स्प्रेसचा खोळंबा

ही मालगाडी वसईकडं निघाली होती, दुर्घटनेमुळं या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Railway
Railway
Updated on

मुंबई : मध्य रेल्वेच्या पनवेल ते कळंबोळी विभागात एका मालगाडीचे पाच डबे रेल्वे रुळांवरुन खासल्याची घटना घडली आहे. पण या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, मेल-एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. लांब पल्ल्याच्या पाच एक्स्प्रेस यामुळं खोळंबल्या आहेत, रेल्वे विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. (Goods train derailment in Panvel Kalamboli section railway traffic affected)

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांचा सुमारास पनवेलहून वसईकडे जाणारी मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली. यामध्ये चार वॅगन आणि ब्रेकव्हॅन असे पाच डबे रेल्वे रुळावरून घसरल्यानं पनवेल ते कळंबोळी विभागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथकासह कल्याण आणि कुर्ला येथून अॅक्सिडेंट रिलीफ ट्रेन घटनास्थळी पाठविण्यात आल्या.

घसरलेले डब्बे रेल्वे रुळांवरुन बाजूला काढण्याचं आणि रुळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. तसेच डब्बे घसरण्याचं कारण काय याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहे. मात्र, या अपघातामुळं मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले असून प्रवाशांना गैरसोयीला सामोरं जावं लागलं आहे.

'या' पाच एक्स्प्रेस खोळंबल्या

या घटनेनंतर तात्काळ डाऊन मार्गावरील ट्रेन क्रमांक १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस कळंबोली इथं थांबविण्यात आली आहे. तर ट्रेन क्रमांक १२६१९ एलटीटी-मंगळुरु एक्स्प्रेस ठाणे स्थानकात, ट्रेन क्रमांक ०९००९ मुंबई सेंट्रल-सावंतवाडी एक्स्प्रेस-तळोजा ते पंचानंद स्थानकांवर थांबविण्यात आली आहे. तर अप मार्गावर ट्रेन क्रमांक २०९३१ कोचुवेली-इंदूर एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक १२६१७ एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस सोमाठाणे इथंल्या रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली आहे.

दिवा-पनवेल डाऊन मार्ग सुरक्षित

पनवेल ते दिवा अप मार्गावर मालगाडीला अपघात झाला असला तरी दिवा ते पनवेल डाऊन मार्ग सुरक्षित आहे. लवकरच डाऊन मार्गावरील मेल एक्सप्रेस गाड्या आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार स्थानकांवरून सुटणार आहेत. पण अप मार्गावरील मेल एक्सप्रेस गाड्यांना काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.