लोकलमध्ये 'बाहुबली'चा प्रवास सुरु ; उपनगरीय मार्गावर पूर्ण क्षमतेने धावणार

Mumbai Local Train
Mumbai Local Trainsakal media
Updated on

मुंबई : राज्य सरकारच्या (Maharashtra government) सूचनेनुसार कोरोना लसीचे (corona vaccine) दोन डोस (two dose) घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल सेवा (Mumbai train) सुरू केली. मात्र, रविवार आणि स्वातंत्र्य दिन (independence day) असल्याने लोकलमध्ये प्रवाशांची संख्या कमी होती. तर, सोमवारी (ता.16) पतेती असल्याने सुट्टी आहे. त्यामुळे मंगळवारी, (ता.17) रोजीपासून लोकलमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये (essential employee) कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या बाहुबलींची संख्या वाढणार आहे. या प्रवाशांचा प्रवास सुरु झाल्याने उपनगरीय मार्गावर (suburban railway) पूर्ण क्षमतेने लोकल धावणार आहे.

एप्रिल अखेरीपासून ते 14 ऑगस्टपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा खुली होती. मात्र, 15 ऑगस्टपासून राज्य सरकारने कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकल सेवा सुरू झाली. तर, यापुढे लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन सुरू आहे. आता सध्या मध्य रेल्वेवरून आणि पश्चिम रेल्वेवरून 90 टक्के क्षमतेने लोकल धावत होत्या. तर, 16 आणि 17 ऑगस्टपासून यामध्ये वाढ केली जाणार आहे.

Mumbai Local Train
मराठी गाण्यांवर मुंबई विमानतळावर फ्लॅशमॉब ; वादांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न

मध्य रेल्वेवर कोरोना पूर्वी एकूण 1 हजार 774 लोकल फेऱ्या धावत होत्या. तर, आता 1 हजार 612 फेऱ्या धावत आहेत. 16 ऑगस्टनंतर गर्दीचा आढावा घेऊन फेऱ्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. पश्चिम रेल्वेवर कोरोना पूर्वी 1 हजार 367 लोकल फेऱ्या होत होत्या. तर, एप्रिलनंतर फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी 14 ऑगस्टपर्यंत एकूण 1 हजार 201 फेऱ्या धावत होत्या. मात्र, 16 ऑगस्टपासून 1 हजार 300 फेऱ्या धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

'येत्या दिवसांतील प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेतला जाणार आहे. त्यानुसार लोकल फेऱ्याबाबत नियोजन केले जाईल.'

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

पहिल्याच दिवशी रेल्वे परिसरात प्रवाशांची तुरळक वर्दळ दिसून आली. फक्त सकाळी आणि सायंकाळी पीक अव्हरच्या वेळी मोजके अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.