मुंबई : ग्रामीण व शहरी भागातील तळागाळातील मुले शिकली पाहिजे. शाळांमधील ओढ वाढली पाहिजे, या उद्देशाने सरकारतर्फे पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील शासकीय, जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी अनुदानित अशा एकूण तीन हजार २७१ शाळांना पाठ्यपुस्तके दिली आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीमधील मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी माध्यमातील ११ लाख ३५ हजार ११९ विद्यार्थ्यांना मागणीनुसार पाठ्यपुस्तके तालुका स्तरावर दिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाकडून सांगण्यात आली.
बालभारती भांडार यांच्याकडे जिल्हा परिषदेकडून ११ लाख ३५ हजार ११९ पाठ्यपुस्तकांची मागणी केली होती. त्यानुसार अलिबाग तालुक्यातील २५१ शाळांना ८३ हजार ३१७, पेणमधील २७५ शाळांना ९४ हजार २१७, पनवेलमधील ३४५ शाळांना २ लाख ८० हजार ९२९, उरणमधील ८० शाळांना ५७ हजार ९१८, कर्जतमधील ३१७ शाळांना एक लाख १५ हजार ६७८, खालापूरमधील २२८ शाळांना ८६ हजार १३९, सुधागडमधील १७३ शाळांना ५१ हजार ३१८, रोहामधील २८५ शाळांना ७१ हजार २११, माणगावमधील ३२६ शाळांना ७८ हजार ५३०, महाडमधील ३७४ शाळांना ७८ हजार १५१, पोलादपूरमधील १५७ शाळांना २१ हजार ४०२, म्हसळामधील १२२ शाळांना २८ हजार ५९५, श्रीवर्धनमधील १२३ शाळांना ३८ हजार ५६६, मुरूडमधील ११३ शाळांना ३१ हजार ७०८, तळामधील १०२ शाळांना १७ हजार ४४० विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके तालुका स्तरावर वितरित केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.