मुंबई : वाढत्या कोरोना संसर्गाला (Corona Infection) आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बंधांची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) ओसरत असताना निर्बंध शिथिल करण्यात येत असतानाच , दुसरीकडे कोरोनाच्या नव्या डेल्टाप्लस व्हेरियंटमुळं (Delta plus variant) संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) धोका निर्माण झाला आहे. अंशत: निर्बंध शिथिल जरी होत असले तरी अत्यावश्यक सेवा वगळता सामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास बंदी अजूनही कायम आहे. मात्र,असे असतानाही तोतया आळखपत्राद्वारे (Fake Identity Card) काही नागरिक लोकलने प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे. त्यातच विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांचीही संख्या वाढत आहे.या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून ( Railway Ministry) या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मागील दोन महिन्यांत मध्य रेल्वे प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्या तब्बल १५०० प्रवांशाकडून २.९३ लाख रुपयांची दंडवसूली करण्यात आली आहे. प्रवाशांनी मास्क लावणे अनिवार्य आहे.तसेच कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र, काही प्रवाशांकडून कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.( Railway Government fines without mask commuters and ticketless travelers-fine collected-Action by Railway-Fake Identity card People)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात अवैधरित्या बनावट ओळखपत्र दाखवून उपनगरीय रेल्वेत प्रवास करणाऱ्या ३००० प्रवाशांना पकडल्याची नोंद झालीय. या प्रवाशांकडून १५ लाख रुपयांचा दंड रेल्वे प्रशासनाने वसूल केला आहे. तसेच विनाटिकीट प्रवास करणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. एप्रिल महिन्यात २८९१० प्रवासी,मे मध्ये ३२९०७ तर २४ जून पर्यंत ३०३४६ विनाटिकीट फिरणारे प्रवासी पकडले गेले आहेत. अशी माहिती रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात अनुक्रमे १.०४ कोटी रुपये,१.१८ कोटी आणि १.०८ कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.
आरोग्य विभाग,सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा प्रशासनाकडून देण्यात आलीय. मात्र, २८ एप्रिल पासून २४ जून या कालावधीत बनावट ओळखपत्र दाखवून प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.