मोदी सरकार आणणार #WhatsApp पेक्षा सुरक्षित मेसेजिंग App, हे आहे नाव..

मोदी सरकार आणणार #WhatsApp पेक्षा सुरक्षित मेसेजिंग App, हे आहे नाव..
Updated on

गेल्या काही काळात आपण दररोज वापरत असलेल्या फेसबुक आणि WhatsApp कडून त्यांच्या ग्राहकांचा वैयक्तिक डेटा म्हणजेच माहिती लिक झाल्याचा घटना समोर आल्यात. अशातच आता मोदी सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी अशाच एका अनोख्या मेसेजिंग अॅपची निर्मिती करण्यात येतेय.  

भारत सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलाय. या माध्यमातून आता भारत सरकार एक मल्टीमीडिया मेसेजिंग App ची टेस्टिंग करणार आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे हे App बर्यापैकी WhatsApp किंवा टेलिग्राम सारखं असल्याचं समजतंय. या App ला GIM म्हणजेच गव्हरमेंट मेसेजिंग सिस्टीम असं सध्या नाव देण्यात आलंय.

या अॅपचं टेस्टिंग सध्या ओडिशामध्ये सुरु आहे. एका माहितीच्या आधारे अॅपचं टेस्टिंग सर्वात आधी भारतीय नौसेनेकडून करण्यात येणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रातील माहितीनुसार या GIM App ला केरळ युनिटमधील नॅशनल इंफॉर्मेशन सेंटरने डिझाईन केलंय. हेच सेंटर याला तयार देखील करणार आहे. 
   
या अॅपचा वापर सरकारी कर्मचारी आणि सरकारी संन्स्थांमधील अधिकारी आपल्या दैनंदिन कामासाठी करणार आहेत. सध्या या अॅपच्या Android व्हर्जनवर काम सुरु आहे. या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात Apple फोन वापरणार्यांसाठी आईओएस वर्जनचं टेस्टिंग करण्यात आलंय.      


महत्त्वाची बातमी : कोस्टल रोडवरील स्थगिती उठली, आता उत्तर मुंबई येणार दक्षिण मुंबईजवळ
 
ओडिशा सरकारच्या फायनान्स विभागात या अॅपचं पायलट टेस्टिंग देखील सुरु असल्याची माहिती समोर येतेय. इथं सर्व कर्मचाऱ्यांना हे App आपापल्या मोबाईलमध्ये टाकण्याचे आदेश देण्यात आलेत.  

Facebook आणि WhatsApp सारख्या विदेशी कंपन्यांकडून भारतीयांच्या वैयक्तिक माहितीबद्दल अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. WhatsApp सारखंच GIM अॅप देखील एंड-टू-एंड इंक्रिप्टेड असणार आहे. अजूनही या अॅपची रूपरेखा कशी असणार याची माहिती समोर आलेली नाही 

Webtitle : Government of India to launch secure messaging app just like whatsapp and telegram  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.