मुंबई ः कोरोनाचे कारण देऊन विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न असून हे सरकार हिवाळी अधिवेशनापासून पळ काढत आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
अधिवेशनाच्या तारखा तसेच ठिकाण याबाबत अजूनही अनिश्चितता असून यासंदर्भात वेगवेगळी विधाने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी वरील टीका केली आहे. महाराष्ट्रात उद्योगधंदे बंद पडले आहेत, बेरोजगारीचा विषय वाढत आहे, अन्य कित्येक समस्या आ वासून उभ्या आहेत. अशा या सगळ्या विषयांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील जनता विधीमंडळ अधिवेशनाची वाट पाहत आहे. पण या अधिवेशनापासून पळ काढण्याची भूमिका या सरकारची दिसते आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशाचा कालावधी ठरवू असे सरकार आधी सांगत होते. मात्र हेच सरकार आता अधिवेशनापासून पळ काढण्यासाठी कोरोनाचा आधार घेत हे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याची टिका दरेकर यांनी केली.
एसटीचे भवितव्य काय
कोकणातील निसर्ग वादळाच्याबाबतीत सरकारने जी मदत जाहिर केली ती अजूनही कोकणवासियांना पूर्ण मिळालेली नाही. त्यामुळे सरकारच्या फक्त घोषणाच होत आहेत, प्रत्यक्षात काहीच कृती होत नाही. एसटी च्या बाबतीतही तसेच होत आहे, असेही दरेकर यांनी दाखवून दिले. एसटीची सध्याची अवस्था कठिण असतानाही परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचा-यांना दोन महिन्याचा पगार दिला. पण दोन महिन्यांच्या पगाराने हा प्रश्न सुटणार नाही. आजचे मरण दोन महिन्यांनी पुढे ढकलले गेले आहे. दोन महिन्यानंतर एसटीचं भवितव्य काय, याचाही आघाडी सरकारने विचार करावा, असेही त्यांनी नमुद केले
राऊत यांची भूमिका दुटप्पी
बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असताना ते मुख्यमंत्री झाले तर तो बिहारच्या जनादेशाचा अपमान होईल, असे म्हणणाऱ्या शिवसेनानेते संजय राऊत यांची भूमिका दुटप्पी आहे. कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकावर होता व शिवसेना तिसर्या क्रमांकावर होती. तरीही महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान झाला नाही का. शिवसेना व भाजपची युती असताना कमी जागा मिळूनही महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा जनतेचा अपमान झाला नाही का. त्यामुळे आता नितीशकुमार मुख्यमंत्री झाले तर तो बिहारी जनादेशाचा अपमान होईल, असे सांगणाऱ्या राऊत यांची व शिवसेनेची भूमिका दुटप्पी आणि सोयीची असल्याची टिकाही दरेकर केली आहे.
The government is running away from the winter session Criticism of Praveen Darekar
-----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.