मुंबईः विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यात असलेल्या महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजय झाला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या. भाजपचा केवळ धुळे-नंदुरबारची एकमेव जागेवर विजय झाला आहे. नागपूर, पुणे, औरंगाबाद याासाख्या भाजपच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. या विजयावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका हिंदी सिनेमाच्या गाण्याच्या ओळी शेअर केल्या असून त्यात जोरदार टीका केली आहे.
ये क्या हुआ?
कैसे हुआ?
कब हुआ?
क्यों हुआ?..ये ना पुछो! विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या. महाविकासआघाडी ला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार कौल दिलाय. आतातरी विरोधकांनी महाराष्ट्र घडवण्याच्या कामी सरकारला साथ द्यावी.ते जमत नसेल तर महाराष्ट्रद्रोही चाळे तरी बंद करावेत, अशी खोचक टीका अनिल देशमुखांनी केली.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) December 4, 2020
महत्त्वाची बातमी- MLC Election Results 2020: 'मविआ'ची ताकद ओळखण्यास कमी पडलो- फडणवीस
अनिल देशमुख यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी महाविकासआघाडीच्या विजयी शिलेदारांचे अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विट लिहिलं की, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात स्पष्ट कौल देणाऱ्या महाराष्ट्रापुढं आम्ही नतमस्तक आहोत. सत्तेत राहण्यासाठीचे गणित आम्ही वर्षापूर्वीच जुळवले; आता भरभक्कम लोकसमर्थनही मिळवले. कालही आम्ही जनतेपुढे विनम्र होतो, आजही आहोत आणि सदैव राहु. महाविकासआघाडीच्या विजयी शिलेदारांचे अभिनंदन.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) December 4, 2020
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र निवडणूक लढल्यानं भाजपला जबरदस्त धक्का बसला. यात भाजपनं औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे तर भाजपचा बालेकिल्ला नागपूर पदवीधर मतदारसंघही गमावला आहे. पदवीधरच्या या तिन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
graduate constituency election result 2020 home minister anil deshmukh reaction tweet
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.