Gram Panchayat Election : ठाकरेंचा शेवटून पहिला नंबर, ग्रामपंचायत निवडणूक निकाला वरून; श्रीकांत शिंदे यांचा ठाकरेंवर निशाणा

ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेला कधी नव्हे येवढे यश मिळाले आहे. महाविकास आघाडीला निम्म्यापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत.
gram panchayat election result shrikant shinde criticize uddhav thackeray politics mumbai
gram panchayat election result shrikant shinde criticize uddhav thackeray politics mumbaiSakal
Updated on

डोंबिवली - ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेला कधी नव्हे येवढे यश मिळाले आहे. महाविकास आघाडीला निम्म्यापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. 2019 मध्ये स्वतःसाठी आपण लोकांचा विश्वासघात केला. त्याचा बदला म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना त्यांची जागा जनतेने दाखवली आहे असे म्हणत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

5 व्या नंबर वरून ते 7 व्या नंबरवर गेले आहेत. ही वेळ का आली ? तर अडीच वर्षात जी कामे ते करू शकले नाहीत. ती कामे सव्वा वर्षात मुख्यमंत्री शिंदे यांनी करत जनतेला दाखवून दिले आहे असे ही खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

कल्याण ग्रामीण भागातील कोणी गावात श्री दत्त नवनाथ मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शाखा कोणी तसेच मोफत रुग्णवाहिकेचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी गोपाळ लांडगे, भरत भोईर, महेश गायकवाड, महेश पाटील, हनुमान ठोंबरे, राजेश मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर आता शिवसेनेने आपले लक्ष लोकसभा निवडणुकीवर केंद्रीत केले आहे. खासदार डॉ. शिंदे हे यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. खोणी येथे कार्यक्रमानिमित्त खासदार आले असता त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना गावात घरोघरी जा. नागरिकांच्या समस्या जाणून घ्या असा सल्ला दिला. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी ठाकरे गटाला टोला हाणला आहे.

खासदार शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करत आहोत. महाराष्ट्रात विविध विकास कामे जी सुरू आहेत ती सरकारच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जात आहोत.

याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीत दिसून आला आहे. ग्रामीण भागामध्ये शिवसेनेला कधी एवढे यश मिळालं नव्हतं. तेवढ यश हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मिळाल आहे. महाविकास आघाडीवरचा लोकांचा विश्वास पूर्णपणे गेलेला असून निम्म्यापेक्षा कमी जागा महाविकास आघाडीला मिळाल्यात.

लोकांचा विश्वास महायुतीवरती राहिला नसून त्यावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब करण्याचे काम सामान्य जनतेने केले आहे. हे का झाले तर मुख्यमंत्री शिंदे हे राज्यात विविध भागांमध्ये जाऊन तेथील समस्या सोडवण्यासाठी स्वतः उतरत आहेत.

काश्मीर मध्ये शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला, नाले साफसफाई मध्ये उतरणार मुख्यमंत्री पहिल्यांदा महाराष्ट्राने पहिला असेल. मुख्यमंत्र्यांवर लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि त्या वाढत्या विश्वासावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये झाले.

ठाकरे यांना टोला लगावताना शिंदे म्हणाले, स्वतःसाठी 2019 मध्ये लोकांचा विश्वासघात आपण केला. त्याचा बदला म्हणून लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवली. म्हणजे अपक्ष पेक्षा मागे सातव्या नंबर वरती तुम्हाला समाधान मानावे लागले.

अगोदर पाचव्या नंबरवर होते आता सातव्या नंबर वरती गेले. शेवटून पहिला नंबर आलेला आहे त्यांचा. अशी परिस्थिती का झाली कारण अडीच वर्षांमध्ये जे काम तुम्ही करू शकले नाही. ते काम सव्वा वर्षात शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिले आहे. एक ही दिवस न थांबता एकही दिवस न सुट्टी घेता काम करणारा मुख्यमंत्री कोण असेल तर एकनाथ शिंदे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे लोकं काम करतो असे ही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.