ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र, एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे शहरात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात देखील वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 71 टक्क्यांवर असून त्या तुलनेत ठाणे शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्क्यांवर पोहोचले आहे. याबाबतीत ठाणे शहराने देशात दुसरा, तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ठाणे शहरात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केला होता. त्यावेळी तूरळक प्रमाणात असलेली रुग्ण संख्या मे, जून आणि जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली. पालिका हद्दीत आतापर्यंत 23 हजार 632 कोरोना रुग्ण आढळले. तर मंगळवारपर्यंत (ता. 18) यातील 20 हजार 989 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतार्पयत 758 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ही 1 हजार 885 एवढी आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही 90 टक्यांवर आले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका प्रशासनाने शहरात केलेल्या विविध स्वरुपाच्या उपाययोजनांमुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील झोपडपट्टी भागात सर्वेक्षण करणे, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप, वेळीच कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण करणे आदी उपाययोजनांमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मुंब्रा, वागळे, लोकमान्य नगर आदींसह इतर भागात राबविलेल्या विविध पॅटर्नमुळे झोपडपट्टीतील कोरोना रोखण्यात पालिकेला यश आले आहे.
विविध उपाययोजना राबवल्यामुळेच ठाणे शहरात कोरोनाचे संक्रमण रोखण्यात यश येत आहे. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, शिक्षक यांच्यासह नगरसेवकांनी देखील मेहनत घेतली. शहरात कोरोना कमी झाला म्हणजे संपला, असे नागरिकांनी समजू नये. यापुढेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क परिधान करणे गरजेचे आहे.
- नरेश म्हस्के
महापौर, ठाणे
---------------
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
महाराष्ट्र राज्य = 71
ठाणे = 89
कल्याण-डोंबिवली = 85
मुंबई = 81
नवी मुंबई = 82
पुणे महापालिका = 78
दिल्ली राज्य = 90
__________
(संपादन : प्रणीत पवार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.