राणेंना दिलासा; बंगल्यावरील कारवाई तुर्तास टळली

अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेनं दिली होती नोटीस
Narayan Rane Adhish Bunglow
Narayan Rane Adhish BunglowTeam eSakal
Updated on

मुंबई : नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) आज (मंगळवार) तुर्तास दिलासा दिला. पालिकेनं दिलेल्या अनधिकृत बांधकामावर तुर्तास कारवाई करु नये, असा आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिला आहे. (Great relief to Narayan Rane Mumbai High Court says No immediate action on BMC notic)

Narayan Rane Adhish Bunglow
... तर RSS ला जनाब संघ म्हणणार का? : संजय राऊत

हायकोर्टानं म्हटलं की, "मुंबई महापालिकेच्या नोटिशीला उत्तर देताना आपलं बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडं जो अर्ज केला आहे, त्यावर कायदेशीररित्या पालिकेनं सुनावणी घेऊन निकाल देणं बंधनकारक आहे. ती सुनावणी घेऊन त्यांनी तातडीनं निकाल द्यावा आणि हा निकालही नारायण राणेंच्या विरोधात गेला तर त्यावर तीन आठवड्यांपर्यंत कुठलीही कारवाई करु नये"

Narayan Rane Adhish Bunglow
The Kashmir Files: राजस्थानमध्ये चित्रपट पाहण्यासाठी 144 कलम लागू

हायकोर्टाच्या या निर्णयामुळं पुढील तीन आठवड्यात नारायण राणे यांच्याकडे पुन्हा कोर्टात दाद मागण्याचा पर्याय खुला असेल. त्यामुळं नारायण राणेंच्या याचिकेवर हायकोर्टानं सुनावणी घेत पालिकेला सध्यातरी कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले, यामुळं नारायण राणे यांना दिलासा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.