मुंबई: दिवाळी हंगामाचे औचित्य साधून दिवाळीचा अतिरिक्त गर्दी च्या नियोजनासाठी परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांनी अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये 9 ते 13 नोव्हेंबर दरम्यान उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ऑनलाइन पद्धतीने 36 हजार 15 तिकिटांची बुकिंग करून 59 हजार 731 प्रवाशांनी वाहतूक केली. ज्यातून एसटीला लाखोंचे उत्पन्नाची कमाई झाल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे आधीच एसटीचे दिवाळे निघाले. आर्थिक परिस्थिती नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम झाला तर एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोना लागण होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशा दुष्टचक्रात अडकलेल्या एसटीला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून केली जात आहे.
या माध्यमातूनच सध्या, दिवाळी हंगामाची कमाई करण्यासाठी एसटीने नियोजन केले होते. त्याचा फायदा एसटीला होत आहे. 9 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या एसटीच्या अतिरिक्त फेऱ्या 13 तारखेपर्यंत हळूहळू वाढल्या असून, यामाध्यमातून प्रवासी संख्या आणि ऑनलाइन तिकीट विक्री सुद्धा वाढली आहे. शिवाय दिवाळीच्या परतीच्या हंगामात सुद्धा अतिरिक्त फेऱ्या आणि ऑनलाइन तिकीट बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
तारीख | अतिरिक्त बस संख्या | एकूण प्रवासी | एकूण ऑनलाइन तिकीट विक्री |
9 नोव्हेंबर | 239 | 8413 | 5124 |
10 नोव्हेंबर | 277 | 8653 | 5240 |
11 नोव्हेंबर | 729 | 13386 | 8022 |
12 नोव्हेंबर | 805 | 14613 | 8799 |
13 नोव्हेंबर | 828 | 14666 | 8830 |
एकूण | 2878 | 59731 | 36015 |
------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Great response ST extra Diwali season 2878 extra buses ran in five days
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.