मुंबई : नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर (ChaityaBhumi) जाऊन त्यांना अभिवादन केलं. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी जयंतीनिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. पण नवाब मलिकांच्या मालमत्ता जप्तीवर भाष्य करणं त्यांनी टाळलं. (Greetings to B R Ambedkar from Sameer Wankhede refrained from commenting on Nawab Malik)
वानखेडे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व तरुणांना आणि सर्वांना सांगतो की बाबासाहेबांना तुम्ही आदर्श माना. जो संघर्ष त्यांनी केला आहे तसेच त्यांचं शिक्षण आणि विचारधारेवर तरुणांनी मार्गक्रमण करावं. आंबेडकर कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेजमध्ये बाबासाहेबांच्या विचारधारेवर लेक्चर ठेवण्यात येणार असून त्यातून तरुणांना प्रेरणा घ्यावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, नवाब मलिकांच्या मालमत्ता जप्तीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भाष्य करणं टाळलं. काही काळापूर्वी मलिक आणि वानखेडे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. आर्यन खान प्रकरणात मलिकांनी वानखेडेंविरोधात अनेक पुरावे माध्यमांद्वारे समोर आणत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. याचमुळं वानखेडेंची उचलबांगडी होऊन त्यांची दुसरीकडे बदली करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.