Organ Donation : मुंबईत अवयवदानाची वाढती गरज ; २५ वर्षांत १८ हजार रुग्णांची नोंदणी,फक्त १० टक्के रूग्णांना अवयव

गेल्‍या २५ वर्षांत १८ हजार रुग्णांची अवयवांसाठी नोंदणी झाली आहे. फक्त १० टक्के रुग्णांनाच आतापर्यंत अवयव मिळाले आहेत. त्‍यामुळे सध्या अवयवदान करण्याची वाढती गरज निर्माण झाली आहे.
 मुंबईत अवयवदानाची वाढती गरज
Organ Donationsakal
Updated on

मुंबई : गेल्‍या २५ वर्षांत १८ हजार रुग्णांची अवयवांसाठी नोंदणी झाली आहे. फक्त १० टक्के रुग्णांनाच आतापर्यंत अवयव मिळाले आहेत. त्‍यामुळे सध्या अवयवदान करण्याची वाढती गरज निर्माण झाली आहे. व्यवसायाने सीए असलेले प्रणीत प्रदीप गांधी हे अवयवदान करणाऱ्या कुटुंबांपैकी एक आहेत. त्‍यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या वडिलांचे अवयवदान करून सुमारे पाच जणांना नवजीवन दिले आहे.

प्रणितप्रमाणेच शिक्षिका दीपाली सिद्धपुरा यांनीही धाडस दाखवत पतीचे तीन वर्षांपूर्वी अवयवदान केले. अशाप्रकारे गेल्‍या २५ वर्षांत मुंबईतील एक हजार ८८४ जणांना अवयवदानाचा लाभ मिळाला; पण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. ही मोठी तफावत कमी करण्यासाठी आता अवयवदानाबाबत अधिकाधिक जनजागृती करण्यावर भर दिला आहे. या २५ वर्षांत समितीच्या माध्यमातून ६५१ ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान करण्यात आले. त्यामुळे वर्षानुवर्षे अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या एक हजार ८८४ रुग्णांना नवजीवन मिळाले. सायन रुग्णालयात १९९७ मध्ये पहिले किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. समिती स्थापन होण्यापूर्वी शासकीय रुग्णालयात अवयवदान होत असे.

 मुंबईत अवयवदानाची वाढती गरज
Election and Wedding Season : मतदानाने साधलाय लगीनघाईचा मुहूर्त ; दोन महिन्यात अवघे १२ शुभ दिवस

१ फेब्रुवारीपर्यंतची नोंदणी

१९९७ ते २०२४ पर्यंत १८ हजार २२६ लोकांनी अवयव प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली होती. १८ हजार २२६ पैकी १२ हजार ७१३ किडनीचे रुग्ण होते. तर हृदय ५०३, यकृत पाच हजार २५८, फुप्फुसासाठी २१२, स्वादुपिंडासाठी ३७ रुग्णांनी नोंदणी केली.

रुग्णांची प्रतीक्षा यादी

  • किडनी ३,५८६

  • यकृत ५५१

  • फुप्फुस २९

  • हात ७

  • हृदय ५७

  • स्वादुपिंड १४

  • लहान आतडे २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.