Aaditya Thackeray News: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज मुंबईत आहेत. व्हायब्रन्ट गुजरात ग्लोबल समिट २०२४ साठी पटेल मुंबईत आले आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी भूपेंद्र पटेल यांच्या दौऱ्यावरुन शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला होता. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी भूपेंद्र पटेल यांना सल्ला दिला आहे.
"गुजरातमध्ये उद्योगधंदे वाढावेत यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा हा खटाटोप आहे. पण त्यांना एवढी मेहनत करायची गरजच काय? फक्त एक फोन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना केला असता, तर त्यांनी आनंदाने कोलांट्या उड्या मारत इकडचे उद्योग तिथे पाठवायच्या कार्यक्रमाला अधिक वेग दिला असता," असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना दिला.
वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एयरबस-टाटा, ४० गद्दार....सगळंच तर पाठवलं तिथे... अजून काय पाहिजे?, असा खोचक प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
"मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम मात्र होऊ नाही शकला, कारण त्या खोके सरकारचे मॅग्नेट स्वतःसाठी खोके खेचतंय आणि उद्योग-रोजगार गुजरातला पाठवतंय. गुजरातला पाठवतात रोजगार आणि मिंधे सरकार रोज गार", असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.