होय! मी ३०० ते ५०० रुपये घेतले, पण... कोर्टात सदावर्तेंची कबुली

Offensive statement about Maratha reservation Gunratna Sadavarte Filed crime in beed
Offensive statement about Maratha reservation Gunratna Sadavarte Filed crime in beedgoogle
Updated on

शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि अन्य ११४ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. सदावर्ते यांना या प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मात्र, त्यांच्यामागे आता चौकश्यांचा ससेमिरा लागलाय. (Gunratna Sadavarte in Court)

कोल्हापूर, सातारा, अकोला अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने विविध प्रकरणांमध्ये चौकशीसाठी त्यांची पोलीस कस्टडी मागण्यात येत आहे. त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल झाल्याने त्या देखील अडचणीत आल्या आहेत. दरम्यान, सदावर्तेंनी प्रत्येक कामगाराकडून ३०० ते ५०० रुपये वर्गणी घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यावर मोठा खुलासा झाला आहे. (ST Workers Strike)

Offensive statement about Maratha reservation Gunratna Sadavarte Filed crime in beed
वडापावचं आमिष अंगलट? एसटी कर्मचारी पोलिसांच्या जाळ्यात

नोटा मोजायची मशीन ते हर्षद मेहता स्कॅम

पुढील तपासासाठी सदावर्तेंची पोलीस कस्टडी हवी असल्याची मागणी सरकार वकील प्रदिप घरत यांनी केली आहे. त्यांनी हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल सदावर्ते प्रकरणात रेफरन्स म्हणून वाचून दाखवला. यावर सदावर्तेंनीही युक्तीवाद केला आहे मी चौकशीत सहकार्य करत आहे. जयश्री पाटील यांना अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजूर केला आहे. त्यामुळे माझे मूलभूत हक्क कोर्टाने अबाधित ठेवावे, असं सदावर्तेंनी म्हटलंय.

कागदपत्र जप्त केले ते वकालतनामा आहेत. माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला देण्यात आला, हे दुःखद आहे. नोट मोजायचे मशीन 3000 रुपयांची आहे. कामकाजाच्या सुविधेसाठी ती घेण्यात आल्याचं सदावर्तेंनी स्पष्टीकरण दिलंय. मी मालमत्ता घेतल्या त्या सर्व बँकांच्या रेकॉर्ड्सवर असल्याचं ते म्हणाले.

Offensive statement about Maratha reservation Gunratna Sadavarte Filed crime in beed
'माझी आई आणि मुलगी घरात..' सुप्रिया सुळे थेट संतप्त कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात
Offensive statement about Maratha reservation Gunratna Sadavarte Filed crime in beed
सदावर्तेंच्या अडचणीत आणखी वाढ, घरात सापडली पैसे मोजण्याची मशीन

'मी कर्मचाऱ्यांकडून ३०० ते ५०० रुपये घेतले'

गाडी देखील सेकंड हॅण्ड घेतली. माझा स्वातंत्र्यसैनिक असलेल्या सासूला यात्रेसाठी गाडी घेतली. इथे आर्थिक घोटाळा झाल्याचे सांगितलं जातंय. पोलीस हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, की हा एक मोठा 'स्कॅम' आहे. सध्या 48 हजार याचिका कर्त्यांच्या नावाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मी ३०० ते ५०० रुपये घेतले. पण ते फक्त कोर्ट कामकाजासाठी घेतले, असं सदावर्ते यांनी सांगितलं. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो, हे सांगावं असं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.