मुंबईतील निम्मे रुग्ण केवळ पाच प्रभागांत; प्रशासनाच्या नाकी दम...

मुंबईतील निम्मे रुग्ण केवळ पाच प्रभागांत; प्रशासनाच्या नाकी दम...
मुंबईतील निम्मे रुग्ण केवळ पाच प्रभागांत; प्रशासनाच्या नाकी दम...
Updated on

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून, केवळ पाच प्रभागांत 2169 रुग्ण आहेत. धारावीतील रुग्णांची संख्या आता नियंत्रणात येत असली, तरी या पाच प्रभागांमुळे चिंता वाढली आहे.

धारावीत कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे आणि त्यांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे घबराट पसरली होती. आता तेथील रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे; मात्र इतर पाच प्रभागांमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. मुंबईतील एकूण 4870 रुग्णांपैकी साधारणत: निम्मे म्हणजे 2169 रुग्ण या पाच प्रभागांतच आहेत.

हेच ते पाच प्रभाग

  • जी दक्षिण : 600
  • ई : 466
  • के पश्चिम : 373
  • एल : 371
  • एफ उत्तर : 359

धारावीपेक्षा रुग्णांची संख्या अधिक
जी उत्तर प्रभागातील धारावीमध्ये सध्या कोरोनाचे 349 रुग्ण आहेत. परंतु, जी दक्षिण (वरळी), ई (भायखळा), के पश्चिम (अंधेरी), एल (कुर्ला), एफ उत्तर (माटुंगा) या प्रभागांमध्ये धारावीपेक्षा अधिक संसर्ग होत आहे. 

काय आहे कारण?
या पाचही प्रभागांमध्ये दाटीवाटीची वस्ती आहे. झोपडपट्ट्या, चाळी आणि लहान इमारतींची संख्या अधिक आहे. मोठे बाजार असल्यामुळे या परिसरात लोकांची जास्त गर्दी असते.

उपाययोजना सुरू
कोरोनाबधितांच्या संपर्कातील सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. या परिसरांमध्ये आरोग्य शिबिरे घेऊन रहिवाशांची तपासणी करण्यात येत आहे. घरांमधील गर्दी कमी करण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.