नगरसेवक म्हणतात, कार्यकर्त्यांनो... आता उमेदवारी तुम्हाला!

नगरसेवक म्हणतात, कार्यकर्त्यांनो... आता उमेदवारी तुम्हांला!
नगरसेवक म्हणतात, कार्यकर्त्यांनो... आता उमेदवारी तुम्हांला!
Updated on

नवी मुंबई : आरक्षित प्रभागांमुळे मातब्बर नगरसेवकांपैकी तब्बल 50 पेक्षा जास्त नगरसेवकांना पालिका निवडणुकीच्या रिंगणातून आता माघार घ्यावी लागणार आहे. परंतु त्याबदल्यात नगरसेवकांकडून मर्जीतील कार्यकर्त्यांना उभेदवारी देऊन, निवडून आणण्याची मोर्चेंबांधणी आखली जात आहे. त्याकरिता मर्जीतील कार्यकर्ते निवडण्याची चाचपणी सुरू आहे. काही नगरसेवकांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने, त्यांच्या जागेवर पत्नीला उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरक्षण बदलाचा फटका कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत भाजपलाही बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपत आलेल्या नगरसेवकांनी शेजारचे प्रभाग शोधण्याचे काम सुरू केले आहे.

ही बातमी वाचली का? एअरटेल ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
 
एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांकरिता शनिवारी महापालिकेच्या निवडणूक विभागाने आरक्षण सोडत व प्रभागरचनेचा प्रारूप नकाशा जाहीर केला. निवडणूक आयोगाने यंदाच्या आरक्षण सोडतीत चक्रानुक्रमे पद्धतीचा अवलंब केल्यामुळे महापालिकेचे 111 प्रभागांचे आरक्षण बदललेले आहेत. प्रभागात विविध आरक्षण पडल्यामुळे तब्बल 50 पेक्षा जास्त नगरसेवकांना आपल्या उमेदवारीवर पाणी सोडावे लागणार आहे. मात्र, आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी मर्जीतील कार्यकर्ते अथवा पत्नी सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जाणार आहे. माजी महापौर सुधाकर सोनवणे यांचे दोन्ही प्रभाग हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित झाल्यामुळे सलग चार वेळा नगरसेवक झालेल्या सोनवणे यांच्या जागेवर दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळणार आहे. 

विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा प्रभाग ओबीसी महिला झाल्यामुळे त्यांच्या जागेवर नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक संजू वाडे यांचा प्रभाग ओबीसी महिला झाल्यामुळे त्यांनाही नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे. महापौर जयवंत सुतार यांचा प्रभाग ओबीसी महिला झाल्यामुळे त्या जागेवरही महिला उमेदवार द्यावा लागणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांचा प्रभागही ओबीसी पुरुष आरक्षित पडल्यामुळे त्यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. नेरूळमध्ये विशाल ससाणे यांचा ओबीसी महिला प्रभाग झाल्यामुळे त्यांच्या जागेवर महिला उमेदवारी द्यावी लागणार आहे. सभागृहनेते रवींद्र इथापे यांचा प्रभाग ओबीसी महिला झाल्यामुळे त्यांनाही शेजारचा प्रभाग शोधावा लागणार आहे. 

आरक्षित प्रभागांची आकडेवारी 
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2020 करिता आयोगाने 2011 ची जनगणना ग्राह्य धरली आहे. 111 नगरसेवकांमध्ये अनुसूचित जमातीकरिता 2, अनुसूचित जातीकरिता 10, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता 30 व सर्वसाधारण 69 सदस्य असणार आहेत. त्यापैकी 50 टक्के महिला सदस्यसंख्या असणार आहे. त्यापैकी अनुसूचित जमाती एक, अनुसूचित जाती 5, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 15 व सर्वसाधारण 35 अशी 56 महिला सदस्यसंख्या असणार आहे. 

आम्ही लोकशाहीवर विश्‍वास ठेवणारे आहोत. त्यामुळे आरक्षण सोडतीला आव्हान न देता, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास ठेवून आंबेडकरी विचारांचे ओबीसी महिला उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
- सुधाकर सोनवणे, माजी महापौर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.