संजय राठोड यांच्या जागी मला मंत्री करा; असं कोण म्हणाले, वाचा सविस्तर

संजय राठोड यांच्या जागी मला मंत्री करा; असं कोण म्हणाले, वाचा सविस्तर
Updated on

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन वादात अडकलेले मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र आता या रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु झाले आहे. अशातच बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी कंबर कसली आहे. हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. 

संजय राठोड यांच्या ठिकाणी आता मला वनमंत्री करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दोन पत्र लिहिली आहेत. 
७ मार्च आणि ११ मार्चला अशी दोन पत्र हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलीत. संजय राठोड यांची जागा आता मला द्या, अशी मागणी हरिभाऊंनी मुख्यमंत्र्यांना केली. 

या पत्रात त्यांनी म्हटलं की, बंजारा समाजाची सेनेला गरज आहे, मी आपली आमदारकी तुम्हाला मुख्यमंत्री बनवायला धोक्यात आणली असून मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रीपद मिळालं असते 

पुढे त्यांनी लिहिलं की,  शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्याऐवजी मला मंत्री करा. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता वनमंत्रीपद मला द्यावे. हरिभाऊ राठोड यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

आपण विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी काम केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आपला संपर्क आणि काम प्रत्येक जिल्ह्यात असल्याचा उल्लेखही हरिभाऊ करायला विसरले नाहीत. भटक्या विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजाचे नेतृत्त्व केल्यास त्याचा फायदा शिवसेनेला संपूर्ण राज्यात होईल, असंही ते म्हणालेत. 

दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनमंत्रीपद मिळावं यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत आहे. तर मुंबई-ठाण्यातील आमदारही वनमंत्रीपद मिळेल का यासाठी प्रयत्न करत असल्याचं समजतलंय. यामध्ये आमदार रवींद्र वायकर यांचे नाव आघाडीवर आहे.

Haribhau rathod wrote letter cm uddhav thackray for sanjay rathod replacement

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.