Mumbai News: गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची लस तरुणींना विनामूल्य मिळणार!

प्रतिबंधक लसीकरणाचा मोफत लाभ; तरुणींच्या आरोग्याची सुरक्षितता मजबूत
Cervical cancer vaccine will be free for young women
Cervical cancer vaccine will be free for young women sakal
Updated on

माजी यिन म्हणजे यिन मधून बाहेर पडलेल्या तरुणांना आपले कौशल्य मांडून ते वाढवण्याचे व्यासपीठ आहे. यातून थेट धोरण तयार करण्यासाठीच प्रयत्न होतो. याच प्रयत्नांतून गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील लस विनामूल्य देण्याची मागणी मान्य झाल्याची माहिती, आज यिन केंद्रीय आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. उमेश चव्हाण यांनी येथे दिली.

यिनमध्ये एकदा मंत्री झालेल्यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याने त्यांनी महाविद्यालय सोडल्यावर आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग यिन मार्फत समाजासाठी कसा करावा, हा प्रश्न तरुणांच्या मनात येतो. त्याला उत्तर देण्यासाठी आज यिनच्या केंद्रीय समितीच्या सभापती दिव्या भोसले, उपसभापती अनिकेत बनसोडे व चव्हाण आले होते. त्यांनी माजी यिन चे उद्दिष्ट आणि त्यामार्फत होणारी कामे याबाबत तरुणांना माहिती देऊन प्रोत्साहित केले. यिन संपून तुम्ही महाविद्यालयाबाहेर गेलात तरी माजी यिन मार्फत तुम्ही समाजासाठी बरेच काम करू शकता असे त्यांना दाखवून दिले.

Cervical cancer vaccine will be free for young women
Mumbai Crime News: 3 पोलीस अधिकाऱ्यांनी मागितली लाच; गुन्हा दाखल!

यिनच्या राज्य मंत्रिमंडळात पदे भूषवलेल्यांना नंतर केंद्रीय मंत्री होण्याची संधी मिळते. हे अनुभवी यिन सदस्य समाजात आपला प्रभाव पाडत असतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन थेट धोरण तयार करण्यासाठीच प्रयत्न होतो. तरुणांची शक्ती नवनिर्माणासाठी वापरली जाते. त्यासाठी हे केंद्रीय मंत्रिमंडळ असून त्यात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, स्त्री प्रतिष्ठा आदी दहा समित्या केल्या आहेत. या दहा समित्यांच्या अध्यक्षांची निवड लेखी परीक्षा, त्यांचा सात वर्षांच्या सामाजिक कामाच्या अहवालाचे प्रेझेंटेशन व नंतर मुलाखतीमार्फत होते. त्यानंतर निवडणुकीतून सभापती निवडला जातो. तळागाळातील प्रश्न लोकांना भेटल्याशिवाय समजणार नाहीत व त्यांचा अभ्यास केल्याशिवाय काम करता येणार नाही, हे ठाऊक असल्याने भारत यात्रेमार्फत लोकांना भेटण्यावर भर दिला जात आहे, असे दिव्या भोसले यांनी सांगितले.

या मंत्र्यांचा अनुभव, समज, त्यांचे काम, हे सारे संशोधनाच्या माध्यमातून पुढे यावे या संकल्पनेनुसार हे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही भारतभर फिरून परिस्थितीही पाहिली, जम्मू-काश्मीरमध्ये जात प्रमाणपत्र मिळवण्यास दोन वर्षे लागतात हे पाहिले. आपल्या यंत्रणेत कुठेच नसलेल्या सामान्यजनांना भेटण्यासाठी हा प्रवास आहे. अशाच सर्व लोकांना भेटून समस्या व उपायांचा अहवाल पंतप्रधान व राष्ट्रपतींना दिला जाईल, असेही दिव्या भोसले म्हणाल्या.

Cervical cancer vaccine will be free for young women
Mumbai Local Train News: वाशी स्टेशनमध्ये तरुण ट्रेनखाली अडकला, पाहा प्रवाशांनी काय लढवली शक्कल

तर या कामातून आपण यिन या संघटनेला कुठल्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो हे दिसले. त्यामुळे तरुणांनी या संधीचे सोने केले पाहिजे, आमचे पहिले अधिवेशन दिल्लीला झाले, लवकरच केरळातही होईल. देशाच्या पाहणी प्रमाणेच आम्ही परदेशातही पाहणी करणार आहोत. लवकरच दुबईत दौरा करून तिथले प्रशासन, बँक पद्धती, राजकीय व्यवस्था यांची पाहणी करू. आता आपण यिन संघटनेला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम एकत्रितरित्या करू, असे अनिकेत बनसोडे म्हणाले.

तर कोणत्याही गोष्टीला मार्ग देण्याचे महत्त्वाचे काम यिन करते. कर्करोगाच्या भयावह समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्या दिल्ली आणि नाशिकच्या अधिवेशनात प्रस्ताव झाला होता. गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील लस पंधरा हजार रुपयांची असल्याने ती विनामूल्य किंवा अनुदानित रूपात द्यावी असा यिन चा प्रस्ताव होता. त्यानुसार आता नऊ ते १४ वयाच्या मुलींना ही लस विनामूल्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असे डॉ. उमेश चव्हाण म्हणाले. अशाप्रकारे यिनच्या मंत्र्यांनी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी सतत पत्रव्यवहार, ईमेलद्वारे पाठपुरावा करावा. नंतर त्यांना यशही मिळेल, त्यामुळे सतत प्रयत्न करत रहा, असेही ते म्हणाले.

Cervical cancer vaccine will be free for young women
Mumbai News : उध्दव ठाकरे यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचा कल्याण दौरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.