आरोग्य सुविधांची दैना! जव्हारच्या पिंपळशेतमधील आरोग्य निवासी केंद्र ओस

Health Residential Center
Health Residential Center
Updated on

जव्हार : जव्हार तालुक्‍यातील अतिदुर्गम भागात पिंपळशेत खरोंडा हे गाव आहे. आरोग्य सुविधांची येथे वाणवा असल्याने येथील चार ग्रामपंचायतींमध्ये मिळून पिंपळशेत येथे आरोग्य निवासी केंद्र उभारण्यात आले आहे. या आरोग्य केंद्रात निवासी आरोग्य पथकाची नेमणूक देखील करण्यात आली आहे. या ठिकाणी आरोग्य पथकातील डॉक्‍टर, नर्सेस व इतर कर्मचारी वेळेवर येत नसल्याने हे आरोग्य केंद्र ओस पडले आहे. त्यामुळे उपचारासाठी नागरिकांना इतर ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. 

पिंपळशेत परिसरातील लोकांना उपचारासाठी जव्हार खूप लांब पडते. त्यामुळे येथेच डॉक्‍टरांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी निवासी इमारती बांधल्या आहेत. या निवासी केंद्रात नागरिकांवर उपचार करण्यासाठी नऊ पदांची निर्माती आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. यामध्ये डॉक्‍टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफ यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांनी येथेच राहून लोकांना आरोग्य सेवा पुरवणे अपेक्षित आहे. मात्र येथे राहणे तर दूरच, मात्र डॉक्‍टरांसह इतर कर्मचारीही येथे दररोज येत नाहीत, अशी तक्रार येथील नागरिकांची आहे. 

पिंपळशेत निवासी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पिंपळशेत, आकरा, तिलोडा, चाभारशेत, ओझर, दसकोड या सहा ग्रामपंचायती येतात. येथील लोकसंख्या ही 10 हजारांच्या जास्त आहे. या भागामध्ये दळणवळण सुविधा कमी आहेत. अचानक कोणाची तब्बेत बिघडली तर त्यांना उपचारासाठी पिंपळशेतला आणले जाते, मात्र हे निवासी पथक केंद्र बंद असल्याने नागरिकांची मोठी अडचण होते. पिंपळशेत येथील हे आरोग्य पथक जामसर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत; परंतु नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे. 

या भागात अनेक समस्या आहेत. रस्ते तुटले आहेत. येथे उपआरोग्य केंद्र पथक आहेत; परंतु कुणीही तेथे राहत नाहीत. या प्रश्‍नाबाबत आपण पंचायत समितीच्या बैठकीत प्रश्‍न उपस्थित करणार आहोत. या प्रश्‍नाची योग्य दखल न घेतल्याच आपण उपोषण करणार आहोत. 
- मीरा गावित, सदस्या, पंचायत समिती जव्हार. 

आमच्या गावात निवासी पथक आहे. मात्र येथे रात्री नाही तर दिवसाही कोणी उपस्थित नसते. रात्री आम्हाला येथून पेशंट जव्हार येथे उपचारासाठी न्यावे लागत आहेत. 
- बालूराम चौधरी, ग्रामस्थ. पिंपळशेत. 

कोरोना काळात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच स्टाफ कमी आहे; परंतु लवकरच तेथे पथक पाठविले जाईल. 
- डॉ. किरण पाटील, आरोग्य अधिकारी, पं. स. जव्हार. 

(संपादन : वैभव गाटे)

Health Residential Center close at Pimpalshet Jawahar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.