मुंबई : कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट आणि एन-95 मास्क देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. "सेफ्टी किट' पुरवण्याबाबत दोन दिवसांत निर्णय न झाल्यास हे कर्मचारी कोरोनाऐवजी अन्य वॉर्डमध्ये काम करतील, असा पवित्रा म्युनिसिपल मजदूर युनियनने घेतला आहे.
मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, सर्वाधिक रुग्ण व संशयितांना महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जाते. संसर्गजन्य आजारांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचारांसाठी डॉक्टर आणि परिचारिकांसोबत चतुर्थ श्रेणी कामगारही झटत आहेत. डॉक्टर आणि परिचारिकांना पीपीई किट, एन-95 मास्क देण्यात येत असले, तरी चतुर्थ श्रेणी कामगारांना एचआयव्ही किट आणि साधे मास्क देण्यात येत आहेत.
वॉर्ड आणि रुग्णांच्या स्वच्छतेची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असते. कर्तव्य बजावत असताना एक महिला सफाई कामगार आणि आयाला कोरोनाची बाधा झाली. कस्तुरबा रुग्णालयातच या दोघींवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांपेक्षा जास्त काळ वॉर्डमध्ये राहणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सुरक्षितताही महत्त्वाची असल्याचे पत्र म्युनिसिपल मजदूर युनियनने महापालिका प्रशासनाला दिले आहे.
रुग्णालय प्रशासनाने सुरक्षिततेची साधने देण्याबाबत दोन दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास हे कर्मचारी कोरोना वॉर्डऐवजी अन्य विभागातील रुग्णांची सेवा करतील, असा इशारा युनियनचे सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिला आहे.
मोठी बातमी - सॅनिटायझर टनेलचा वारंवार वापर ठरू शकतो घातक...
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा संसर्ग घरापर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची पर्वा रुग्णालय प्रशासनाला नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने या कर्मचाऱ्यांना तातडीने "सेफ्टी किट' पुरवावे. - प्रदीप नारकर, सरचिटणीस, म्युनिसिपल मजदूर युनियन
health workers in mumbais kasturba hospital are not getting PPE kit and N95 mask says majdur union
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.