मुंबईतील होम क्वॉरंटाईन संदर्भात समोर आली 'ही' दिलासादायक माहिती

मुंबईतील होम क्वॉरंटाईन संदर्भात समोर आली 'ही' दिलासादायक माहिती
Updated on

मुंबई: रुग्णवाढ आणि मृत्यूदर कमी झाल्यानंतर आता मुंबईतील होम क्वॉरंटाईनची संख्या देखील घटली आहे. त्यामुळे लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. त्यामुळे मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश येत असल्याचे दिसतेय. 

मुंबई हे कोरोना संसर्ग वेगाने पसरणारे देशातील हॉटस्पॉट शहर ठरले होते. सुरूवातीला मुंबईतील मृत्यूदर ही 8 टक्क्यांच्यावर गेला होता. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. यानंतर लॉकडाऊनसह 'चेस द चेन 'सारखे महत्वाचे निर्णय घेत मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. गेल्या एका महिन्यात मुंबईत होम क्वॉरंटाईनच्या संख्येत 28 टक्क्यांनी घट झाली आहे. तर संस्थात्मक क्वारंटाईनचे प्रमाण ही 62 टक्क्यांनी घटले आहे.

कोरोनाच्या संशयित रूग्णांना होम आणि संस्थात्मक क्वारांटाईन केले जाते. राज्यात 9 लाख 76 हजार 332 होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर 37 हजार 768 लोकं संस्थात्मक क्वारांटईनमध्ये आहेत. मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या घटत असल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्के आहे. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत रूग्णवाढीचा वेग 0.78 इतका आहे. 

मुंबईत रूग्ण दुपटीचा कालावधी आता 89 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत 7 ऑगस्टपर्यंत 5 लाख 93 हजार 230 इतक्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सध्या शहर आणि उपनगरातील चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये 582 कंटेन्मेंट झोन असून 5 हजार 396 इमारती सील करण्यात आल्यात. शनिवारी मुंबईत कोरोनाचे 1304 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 1457 बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबईतील कंटेन्टमेंटची संख्या ही 22 टक्क्यांनी घटली आहे. मुंबईत आज केवळ 582 कंटेंन्टमेंट झोन आहेत. दोन महिन्यांपूर्वी हा आकडा 1200 पर्यंत वाढला होता. दिवसभरात बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या देखील घटली असून 8 ऑगस्टला दिवसभरात केवळ 3939 अति जोखमीचे रूग्ण आढळले तर 4,196 रूग्णांना कोविड केअर सेंटर 1 मध्ये दाखल करण्यात आले.

(संपादनः पूजा विचारे)

heartwarming information regarding home quarantine Mumbai covid19

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.